आजरा. प्रतिनिधी. २९
आजरा तहसिल निवडून विभागाच्या वतीने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार. दि. १/१/२०२२ अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. २९ रोजी आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. भारत निवडणूक आयोगाचे ऑगस्ट २०२१ च्या पत्राला अनुसरून भारत निवडणूक आयोगाने ३ ऑगस्ट २०२१ चे पत्र आदेशाने १ जानेवारी २०२१ या अहर्ता दिनांकावर. आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रमाचे आयोजन आजरा निवडणूक विभागाच्या वतीने केले होते. आजरा तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते मंडळी ( शिक्षक ) बी. एल. ओ. यांना माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार विकास आहिर होते. यामध्ये दुबार समान नोंदी एकापेक्षा अधिक नोंदी त्रुटी दूर करणे इत्यादी साठी दिनांक ९ ऑगस्ट २०२१ सोमवार ते दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२१ रविवार पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या आधारे घरोघरी भेट देऊन तपासणी व पडताळणी करणे योग्य प्रकारे विभाग भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रामाणिकपणे करणे तसेच एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे दिनांक १ नोव्हेंबर २०२१ सोमवार रोजी तर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी १ नोव्हेंबर २०२१ सोमवार ते दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ मंगळवार पर्यंत विशेष मोहिमेचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी मुख्य निवडणूक आयोग अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस दिनांक २० डिसेंबर २०२१ पर्यंत दि. ५ जानेवारी २०२० बुधवार अखेर तर मतदार यादी अंतिम प्रसिद्ध करणे दिनांक १५ जानेवारी २०२२ सदर पुनरीक्षण कार्यक्रम दि.०१/०१/२०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असेल तर सदर कार्यक्रम वरील वेळापत्रकानुसार राबवण्याचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आजरा निवडणूक नायब तहसीलदार श्री कोळी निवडणूक विभागातील कर्मचारी आजरा तालुक्यातील विविध पक्षांचे नेते मंडळी पक्षाचे ता.प्रमुख, उपस्थित होते.
[ २७१ – चंदगड विधानसभा या विभागात १ ते ४२ .४२ केंद्र आहेत.
२७२ राधानगरी. – विधानसभा या विभागात ३७८ ते ४२३ . ४६ केंद्र आहेत. २७३ कागल विधानसभा या विभागात २४३ ते २८९ अशी ४७ केंद्र आहेत. यामध्ये बी एल ओ म्हणून शिक्षक ग्रामसेवक व तलाठी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करणार आहेत यामध्ये प्रामुख्याने १ ते ३ नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार यादी नोंदणीचा कार्यक्रम दि. १३ व १४ दि. २७/ व २८/ २०२१ या रोजी विशेष मोहीम असणार आहे तरी १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपली मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.]
