Homeकोंकण - ठाणेचंदगड तालुक्यातील हेरे सरंजामच्या वर्ग -2 च्या जमिनी लवकर वर्ग -1 करून...

चंदगड तालुक्यातील हेरे सरंजामच्या वर्ग -2 च्या जमिनी लवकर वर्ग -1 करून देण्यासाठी -प्रांताधिकारी वाघमोडे यांना निवेदन.

चंदगड. प्रतिनिधी.

चंदगड तालुक्यातील हेरे सरंजामच्या वर्ग -2 च्या जमिनी वर्ग -1 करण्यासाठी लवकरच कित्येक दिवस प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.असे प्रतिपादन प्रांताधिकारी श्री. बाबासाहेब वाघमोडे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सेक्रेटरी श्री.सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिस्टमंडळांने आज प्रांताधिकारी वाघमोडे साहेब यांची भेट घेऊन हेरे सरंजामच्या वर्ग -2 च्या जमीनी वर्ग-1 लवकर करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली,राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे लवकर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली.
तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय आदेशानुसार ऑनलाइन केलेली पीक पाहणी अजून ७/१२ वर दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले भात शासनाकडे हमीभावा ने विकता येत नसल्याचे निदर्शनास आणले आणि पीक पहाणीची नोंद ताबडतोब ७/१२ वर करणेस आदेश द्यावे अशी विनंती करण्यात आली त्याबाबत सुद्धा त्वरित नोंद करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच अडकुर सारख्या मोठ्या गावात ज्या ठिकाणी अडकुर,मलगेवाडी,विंझने,बोजुर्डी,मोरेवाडी या गावासाठीचे तलाठी कार्यालय कित्येक वर्षे खाजगी आणि अपुऱ्या जागेत सुरू असून तलाठी कार्यालयातील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करतात,त्यासाठी अडकुर येथे प्रशस्थ तलाठी कार्यालय लवकर बांधून जनतेला चांगली सेवा द्यावी अशी विनंती करण्यात आली, यावर सुद्धा जिल्हाधिकारी कार्यलयातून लवकर मंजुरी मिळवून अडकुरला प्रशस्थ तलाठी कार्यालय करण्यात येईल असे प्रतिपादन प्रांताधिकारी श्री बाबासाहेब वाघमोडे साहेब यांनी केले.
याप्रसंगी शिस्टमंडळात अडकुरचे माजी उपसरपंच गणेश दळवी,सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पाटील,शिवराज देसाई उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.