आजरा. प्रतिनिधी. १७.
शेतकऱ्यांना टोपी घालण्यासाठी नेते शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकमत असल्याचे माजी. खास. राजु शेट्टी आजरा येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. वीसावी होणारी ऊस परिषद बाबत आजरा येथील कार्यकर्त्यांशी संवाद व पत्रकार बैठक प्रसंगी ते बोलत होते प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे. ता.अध्यक्ष तानाजी देसाई यांनी केले पुढे श्री शेट्टी म्हणाले एफ. आर.पी. बाबतचा कायदा १९६६ साली झाला. व त्याची दुरुस्ती नेते शरद पवार यांनी २०११ साली केली. पण त्याना एफ. आर. पी. चा अलिकडे साक्षात्कार झाला आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, हे पक्ष विरोधात आहेत. त्याना शेतकऱ्यांच्या बाबत काही देणे – घेणे नाही. पण यासाठी शेतकरी संघटना खंबीर आहे. २०२१ मध्ये ऑक्टोंबर १८ रोजी होणारी ऊस परिषेदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन देखील यावेळी करण्यात आले. या पत्रकार बैठकीला आजरा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंद्रजीत देसाई यांनी आभार मानले
