Homeकोंकण - ठाणेवन्यप्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करावी. -...

वन्यप्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करावी. – कॉ. संपत देसाई.( श्रमिक मुक्ती दलाची निवेदनाने मागणी ) .

आजरा. प्रतिनिधी. ०४
आजरा येथील परिक्षेत्र वनाधिकारी वनविभाग आजरा यांना हत्ती, गवे, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करावी आणि वन्यप्राण्यांच्याकडून होणार्‍या शेतपिकाची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी आशा विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्य वनसंरक्षक, उप वनसंरक्षक यांचेसह वरिष्ठ अधिकार्‍यांची शेतकरी प्रतिंनिधींसोबत बैठक आयोजित करणे बाबतचे श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने दि.४ रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात संदर्भ- १- ९/११/२०२० रोजी शेतकरी वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने आपल्या कार्यालयाला दिलेले निवेदन २- आपल्या कार्यालयावर शेतकरी वनहक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली दि २३ नोव्हेंबर २०२० शेतकर्‍यांचा निघालेला मोर्चा व त्यावेळी झालेली चर्चा आजरा तालुक्यात गेली कांही वर्षे वन्यप्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष चालू झाला आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळीही गेले आहेत. जंगली प्राण्यांच्याकडून शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. याबाबत अनेक लेखी, तोंडी तक्रारी पण दिल्या आहेत. पण वनखाते या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहते असं दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी आता खालील मागण्या घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्धार केला.
१. जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवायचा असेल तर कांही ठोस उपाययोजना हाती घ्यावी लागतील. जंगलाच्या समृद्धिकरणाचा कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा लागेल. बांबू, अकेशिया, निलगिर, सुबाभळ यासारख्या एकाच जातीच्या झाडांची लागवड तातडीने थांबवून या परिसरातील पारंपरिक वृक्षांची लागवड करणे. अकेशिया सारख्या पर्यावरणाला आणि इथल्या जैव विविधतेला बाधा आणणारी झाडे पुर्णपणे काढून टाकणे
२- जंगलातील पाण्याचे स्त्रोत जीवंत करणे. जंगली जनावारांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यासाठी वनतळी तयार करणे.
३- झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम स्तुत्य असला तरी तो कार्यक्रम कुठे राबवावा याचे भान वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाला दिसत नाही. पूर्वी जंगलामध्ये सुदधा चराऊ क्षेत्र होते. त्या क्षेत्रावर गवे, सांबर यांना भरपूर चारा उपलब्ध होत होता. वनविभागाने रिकामी जागा दिसली की पर्यावरणाला घातक असलेली झाडे लावण्याची धडक मोहीम मागच्या कांही वर्षात हाती घेतली. त्यामुळे जंगले हिरवी दिसू लागली पण ती मृत झाली. [ डेड फॉरेस्ट ] चारा संपला, जैव साखळी तुटली त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला. त्यामुळे पूर्वीच्या चराऊ कुरणांचा शोध घेऊन ती विकसित करणे. तिथे चार्‍याची लागवड करणे.
४- सर्व ग्रामपंचायतीकडे असलेली शासनाच्या मालकीच्या गायरान क्षेत्रावर मागच्या पंचवीस तीस वर्षात सामाजिक वनीकरण विभागाने अकेशिया, निलगिर, सुबाभळ या वेगाने वाढणार्‍या परदेशी झाडांची लागवड करून गायराने संपवली. या पर्यावरणाला घातक असणार्‍या झाडांची तोड तातडीने करून पूर्वीसारखीच ते चराऊ क्षेत्र म्हणून राखीव ठेवणे.
५- जंगल हद्दीलगत असलेल्या शेतकर्‍यांच्या आणि जंगलाच्या मध्ये तारेचे सौर कुंपण घालणे.
६- शेती पिकाच्या नुकसानीबद्दल मिळणारी रक्कम ही अत्यंत जुजबी असून शंभर टक्के नुकसान धरून पीक नुकसान भरपाई शेतकर्‍यांना दिली पाहिजे.
७- जंगली प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची जी किचकट प्रक्रिया आहे ती सुलभ आणि सोप्या पद्धतीने करावी.
८- अलीकडे जंगली हत्ती कडून बैलगाडी, छकडा, इलेक्ट्रिक पंप, पॉवर टिलर, नांगरी इत्यादी शेती औजारांची मोडतोड मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
९- हत्ती, गवे यांच्याकडून पाळीवप्राणी आणि माणसे यांच्यावर हल्ले होत आहेत. त्या हल्ल्यानंतर जखमींना दिली जाणारी मदत फारच जुजबी आहे. ती वाढवून मिळाली पाहिजे व त्याबाबत असलेले निकष पण बदलले पाहिजेत.
१०- पिकपंचनामे करून पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी रु ५००००/- च्या आतील रक्कम तातडीने देण्याचे अधिकार परिक्षेत्र वनाधिकारी यांना देण्यात यावेत. याबाबत पूर्वी मुख्य वनसरंक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयाची अमलबजावणी करणे.
११- मागील कांही महिन्यात लोकांना कांहीही माहिती न देता संरक्षित वनक्षेत्रासाठी ग्रामपंचायती कडून ठराव घेतले आहेत. त्या मागे नेमकी काय संकल्पना आहे याची स्पष्टता लोकांना देणे.
१२. ऑनलाईन पीक पाहणी नोंदी करतांना अडचणी आल्या आहेत त्यामुळे वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांचे पंचनामे आपल्या खात्याच्या कर्मचार्यमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून करावी, केवळ सातबारा ग्राह्य धरू नये
१३. मूळ मालक वेगळा असला तरी कासणार्या शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई मिळावी
१४. या परिसरातील पशु, पक्षी, प्राणीशास्त्र, औषधी वनस्पती यासह जैवविविधतेचा सर्व्हे झाला आहे का? झाला असल्यास त्याचा अहवाल मिळावा.
वरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आम्ही शेतकरी या निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत की आपण आपल्या खात्यातील सक्षम वरिष्ठ अधिकारी म्हणजे मुख्य वनसरंक्षक, उपवन सरंक्षक यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करावी ही विनंती. आपण आमच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीचे आयोजन कराल व शेतकर्‍यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही ही अपेक्षा…! सोमवार दि ११ पर्यंत आपल्या कार्यालयाकडून याबाबत बैठक बोलावली अन्यथा श्रमिक मुक्ती दल मंगळवार दि १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मोर्चा घेऊन येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर कॉ संपत देसाई, प्रकाश मोरूसकर, संजय घाटगे युवराज जाधव, दशरथ घुरे,
कृष्णा सावंत, नामदेव फगरे, नारायण भडांगे, शिवाजी शेळके ,मुकुंद नार्वेकर, काशीनाथ मोरे, शांताराम पाटील, विजय बांदेकर ,जोतिबा खामकर्, मारुती पाटील, भीमराव माधव, विजय पाटील, शंकर पाटील दौलत राणे, विष्णु मांजरेकर, नारायण राणे, दौलत राणे, शंकर पाटील, घुनाथ पोवार यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.