आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळ आजाराचे अध्यक्ष व जिल्हा परिषद कोल्हापूर उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांचे हस्ते या दोन्ही प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी प्राचार्य व संचालक सूनील देसाई यांनी मोहनदास करमचंद गांधी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी या दोन्ही नावा मधील गांधीजींचा एकूण जीवन प्रवास आपल्या अभ्यासपूर्ण वाचनातून विशद केला. यामध्ये गांधीजींच्या मनावर लहानपणापासूनच सत्य, अहिंसा आणि त्याग हे संस्कार घडत गेले. अन त्या मार्गावर ते स्वतः चालत अहिंसेच्या मार्गाने भारताला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले हे संपूर्ण जगाने आदर्श घेण्यासारखे आहे. असे ते म्हणाले. श्री शिंपी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बालवयात एखाद्याच्या मनावर चांगले संस्कार कोरले तर, निश्चितपणे चांगल्या कर्मातून महात्मा या उपाधी पर्यंत मानवाला पोहोचता येते. हे गांधीजींच्या कडे पाहिल्यावर समजते. लहानपणी पाहिलेल्या तीन माकडांच्या शिल्पाकृतींचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला …बुरा मत देखो, बुरा मत सूनो,, और बुरा मत कहो. या विचाराप्रमाणे गांधीजींनी आपले आचरण ठेवले. देशातील गोरगरीब जनता आणि त्यांचे दारिद्र्य पाहून त्यांना फार दुःख झाले. त्यांची नेहमी आठवण व्हावी आणि त्यांच्या उद्धारासाठी कार्य करण्याचे बळ आपल्यामध्ये नेहमी यावे म्हणून त्यांनी बॅरिस्टरच्या सूटाबूटाचा त्याग करून फक्त अंगावर एक पंचा परिधान केला आणि त्यावरच आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं. व देशसेवा केली. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही आपल्या कर्तृत्वाने देशांमध्ये हरित क्रांती आणली. जय जवान, जय किसान हा नारा सर्वत्र दुमदुमला यावरून शेतकऱ्यांप्रती त्यांचे प्रेम दिसून येते मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा या शास्त्रजींचा आज जन्मदिवस प्राचार्य .एस. बी. गुरव यांनी या दोन महामानवांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून आपले विचार मांडले गांधीजींना स्वच्छता फार आवडत असेल त्यामुळे आजही आपण त्यांच्या शिकवणीनुसार गाव, घर, शाळा परिसर आणि रस्ते नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला मदत करून सर्वांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगदान देऊ असे सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आण्णासो पाटील, सचिव एस. पी कांबळे, खजिनदार एस. डी चव्हाण सर, व या कार्यक्रमाचे आयोजक व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता अकरावी आर्ट्स ,कॉमर्स, सायन्स या वर्गाचे वर्ग शिक्षक तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख पी. व्ही. पाटील, आर. जी. कुंभार, संजयकुमार पाटील, श्रीकृष्णा दावणे, शिवाजी पारळे , विलास गवारी व कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
