Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र ATS ची पुन्हा मोठी कारवाई.- मुंब्रातून 'मुन्ना भाई'ला अटक.

महाराष्ट्र ATS ची पुन्हा मोठी कारवाई.- मुंब्रातून ‘मुन्ना भाई’ला अटक.

मुंबई. प्रतिनिधी.

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्रितपणे दहशतवादी मॉड्यूलसंबंधित काल, शनिवारी जोगेश्वरी येथून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.मुंबईत हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या एका आरोपीला मुंब्रामधून एटीएसने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव इमरान उर्फ मुन्ना भाई असल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी जाकिर हुसेन शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. जाकिरच्या चौकशीनंतर आज अटक केलेल्या संशयिताचे नाव समोर आले. यानंतर मुंब्रा परिसरात महाराष्ट्र एटीएसने छापा टाकला. गुप्तचर एजेंसीच्या अलर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दहशतवादी रेल्वेमध्ये गॅस अटॅक किंवा प्लेटफॉर्म प्रवाशांच्या गर्दीवर त्यांचा निशाणा आहे.गुप्तचरच्या या अलर्टनंतर सीआरपीने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवली आहे.तसेच स्थानकावरील काही प्रवेश गेट बंद करण्यात आले आहेत.दरम्यान आज अटक करण्यात आलेल्या इमरान उर्फ मुन्ना भाईला एटीएस कोर्टात हजर करून कोठडीची मागणी करतील.

तीन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान संघटीत दहशवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. यादरम्यान ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. यानंतरपासून देशातील विविध भागात भारतीय एजेंसी दहशतवाद्यांशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.