Homeकोंकण - ठाणेकिरीट सोमय्यांची अडचण वाढणार ? कोल्हापुरात अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी निधी संकलन.

किरीट सोमय्यांची अडचण वाढणार ? कोल्हापुरात अब्रूनुकसानीच्या दाव्यासाठी निधी संकलन.

कोल्हापूर. प्रतिनिधी.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे मंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
या आरोपांनंतर हसन मुश्रीफ चांगलेच आक्रमक झाले असून सोमय्या यांच्यावर आपण लवकरच १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. याच दाव्यासाठी न्यायालयात भरण्यासाठी लागणाऱ्या निधीचं संकलनही कोल्हापुरात सुरू करण्यात आलं आहे.
हसन मुश्रीफ हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांनी ताबोडतोब पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले होते. तसंच बिनबुडाचे आरोप करणाऱ्या सोमय्या यांना आपण कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. अब्रूनुकसानीचा १०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यासाठी २५ टक्के रक्कम दावापूर्व भरणे गरजेचे असते. ही रक्कम या दाव्यामध्ये २५ कोटी रुपये होते. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी हसन मुश्रीफ यांना लोकवर्गणी देण्यासाठी त्यांच्या मतदार संघात स्पर्धा सुरू झाली आहे.

कोणत्या शहरातून किती रक्कम मिळणार?

गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध समाज बांधव, संघटना, तरुण मंडळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून ही रक्कम उभी करण्यात येणार आहे. गडिंग्लज येथे पहिल्याच दिवशी ५ लाख ७० हजार रुपये जमा झाले आहेत. शहरातील ख्रिस्ती समाज, धनगर समाज, नाभिक समाज ,गाडी मालक संघटना साई तरुण मंडळ, संघर्ष ग्रुप यांच्यासह अनेकांनी यासाठी वर्गणी दिली आहे.
मुरगूड येथील नगरसेवकांनीही निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. तसंच कागल शहरातून २५ लाख लोकवर्गणी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाश गाडेकर यांनी दिली. याशिवाय कागल मतदार संघातील विविध गाव व संस्थांनी मुश्रीफ यांना लोकवर्गणी करून मदत करण्याची घोषणा केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.