(“आजरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा उदघाटनाचा सोहळा संपन्न. )
आजरा. प्रतिनिधी. १३
आजरा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दि. १२ रोजी आजरा तालुक्यातील हारूर, सरंबळवाडी, गजरगाव, का.कांडगाव, भावेवाडी व चितळे पैकी धनगरवाडा येथे मनसेचे जिल्ह्याचे नेते पुंडलिकभाऊ जाधव जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, जिल्हाअध्यक्ष कामगार सेना मोहन मालवणकर, तालुकाअध्यक्ष अनिल निउंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्ह्याचे नेते पुंडलिकभाऊ म्हणाले महाराष्ट्रा मध्ये मा. राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन तरुण वर्ग शहरासह ग्रामीण भागात एकवटला जात आहे. लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जिल्हा दौरा होणार आहे, यामुळेच कार्यकर्त्यांना अधिक बळकटी येणार असून येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज संस्थांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रा मधे मनसेचे उमेदवार उमेदवारी करणार आहेत.त्याचबरोबर आजरा तालुक्यामध्ये येणारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये मनसे आपले उमेदवार देणार आहे. या अनुषंगाने मनसे सैनिकांनी कामाला लागावे असे बोलताना श्री भाऊ जाधव म्हणाले.
यावेळी जिल्हाधाक्ष नागेश चौगुले यांनी आजरा तालुक्यात मनसे विविध प्रश्न हाती घेऊन लढत आहे, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढेही प्रत्येक अडचणीला मनसे सक्षम असेल. तर मनसे शाखा उदघाटनाचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावात मनसे शाखा असेल तरी येणारी पंचायतसमिती व जिल्हापरिषद निवडणुकीसाठी मनसे सैनिकांनी कामाला लागावे असे श्री चौगुले बोलताना म्हणाले,
सरंबळवाडी तालुका आजरा येथे शाखा उदघाटन सांगता समारंभ व आभार प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक व सूत्र संचालन तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी केले यावेळी कामगार सेनेचे जिल्हाअध्यक्ष मोहन मालवणकर यांनी मनोगत व्यक्त केले या शाखा उदघाटन सोहळ्यासाठी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा(आजरा चंदगड) सौ.पूनम भादवणकर, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ.सरिता सावंत, शहरअध्यक्ष गडहिंग्लज अविनाश तहसीलदार उपस्थित होते.
यासाठी ता उपाध्यक्ष. प्रकाश कांबळे, सौ. भादवणकर सौ.संजीवनी देसाई, सौ.प्रमोदिनी देसाई. पं.स संघटक सौ.शोभा कांबळे, तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर. यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गजरगाव शाखाअध्यक्ष संतोष वाघराळकर, धनगरवाडा शाखाअध्यक्ष विठ्ठल येडगे, भावेवाडी शाखाअध्यक्ष तुकाराम साबळे, सरंबळवाडी शाखाअध्यक्ष किरण पाटील, का.कांडगाव महिला आघाडी शाखाअध्यक्ष मंगल मुगुर्डेकर, हारूर शाखाअध्यक्ष सुनील चौगुले, शहर अध्यक्ष कुणाल पोतदार, वसंत घाटगे, वैभव येसणे, प्रदीप पाटील, सतीश किल्लेदार, प्रथमेश सुकवे, विश्वास कळसकर, रणजीत मोकाशी. आणि सर्व शाखांचे पदाधिकारी मनसे सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुका सचिव श्री सांबरेकर यांनी मानले.
