संपादक. – संभाजी जाधव.
( ॲप ओपन करताना नेटचा सामना. माहिती भरताना शेतकर्याला काहीच कळत नाही. मग “ई पीक-पाहणी नोंद करायची कशी. हा. अडचणीचा सामना.)
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पिक पेरा नोंद ही अतिशय महत्त्वाची बाब असते. महसूल कायद्यानुसार वर्षांनुवर्षे तलाठ्याकडून ही नोंद घेतली जाते. पिकविमा, पिककर्ज, हमीभाव योजनेत धान्याची विक्री, शासकीय योजनांचे लाभ अशा प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला पिकपेरा नोंद महत्त्वाची असते.
ती नोंद नसल्यास शेतकऱ्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागतो. ही समस्या विचारात घेऊन शासनाने ‘इ पीक पाहणी प्रकल्प, राबवण्याचे ठरवले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकाची नोंद आपल्या मोबाईलवर घरबसल्या करता येणार आहे. त्यासाठी आता त्याला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकांची नोंद करण्याची सुविधा यात आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकरी सक्षम आणि स्वयंपूर्ण होईल याची खात्री आहे,कारण त्याला त्याच्या पिकाची नोंद घरबसल्या करण्याचा अधिकार या अँप द्वारे दिला गेला आहे.
” माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिकपेरा” या घोषवाक्य ला सार्थक असे “इ पीक पहाणी” ॲप निश्चितच शेतकऱ्यांना स्वतःची पीक पाहणी स्वतः करण्याचा अधिकार देते त्याचबरोबर पिकविमा, पिककर्ज ,नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई, पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात फायदेशीर ठरणार आहे.
आपणास या अँप वापरात काही अडचणी येत असतील आपल्या गावांमधील तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्यांचे समाधान करून घ्यावे.हे अँप प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. तसेच सर्वांना लक्षात असू द्या आपल्याला खरिपाची पीक पाहणी १५ सप्टेंबर पर्यंत या ॲप मध्ये भरावयाची आहे.
{ शासनाच्या दृष्टिकोनातून शेतकरी स्वतःचे पीक पाणी स्वतः लावावे व शेतकऱ्याला अधिक माहिती मिळावी यासाठी देखील ही योजना महत्त्वाची असली तरीही अजूनही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याबाबतची माहिती जरी महसूल विभागाच्या कार्यशाळेतून देत असले तरीही शेतकऱ्यांना ती माहिती न समजणारी आहे. अजूनही ग्रामीण भागातील ७० टक्के पेक्षा जास्त शेतकरी वर्गांनी अजूनही आपली पीक – पाणीची नोंद केली नसल्याचे समजते याबाबत महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या सातबारा पत्र की चुकीची नोंद होऊ नये व खऱ्या पिकाची माहिती मिळण्यासाठी सातबारा पत्र की नोंद शेतकऱ्यांनी घालावी मग महसूल विभागाचे काय काम असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने दिलेली मुदत व प्रत्येक शेतकऱ्याला आपले गट नं, खाते नं नेमके माहित असतीलही असे नाही. यामुळे पीक पाण्याची नोंद झालेल्या करता कोणत्या गटात कोणते पीक आहे याची माहिती नसते शासनाने दिलेल्या ॲपमध्ये चुकीची माहिती नमूद होऊ शकते यासाठी पीक पाण्याची नोंद घालण्याचे महसूल विभागाचे काम त्या विभागाने करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.तर यामध्ये पीक पाणी नोंद करताना शेत पिकाचा फोटो द्यावा लागतो म्हणजे शेतामध्ये असताना याची नोंद घालावी लागते यामध्ये काही ठिकाणी मोबाईल रेंज नसते मग ई पीक पाहणी नोंद करायची तरी कशी यामुळे या पुर्वी चाललेले महसूल विभागाचे कामकाज कायमस्वरूपी तलाठी कार्यालयात जाऊन आपली पीक पाहणी नोंद योग्य असे काही शेतकऱ्यांचे मत आहे. }
