Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यात घरफोडी: 14 लाखांचा ऐवज लंपास.

आजऱ्यात घरफोडी: 14 लाखांचा ऐवज लंपास.

आजऱ्यात घरफोडी: 14 लाखांचा ऐवज लंपास.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील शिवकॉलनी, गांधीनगर रोड परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी-कोयंडा कट करून १४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दि. २० जून २०२६ रोजी रात्री १० ते २१ जून २०२६ रोजी सकाळी ११ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी प्रकाश नवनाथ शिंदे, वय 39, शेअरमार्केट ट्रेडींग व्यवसाय, यांच्या घरातून 15 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने, 17 तोळे 5 ग्रॅम चांदीचे दागिने व 20,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली. तसेच शेजारी राहणारे युवराज जाधव यांच्या घरातील 9.5 ग्रॅम सोने, 3 तोळे चांदी व संजय यशवंत भोये यांची होंडा शाईन मोटरसायकल क्र. MH 15 HR 1597 चोरट्यांनी नेली.

प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गु. र. नं. 163/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305(A) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.