वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे स्वाभिमानीचे नेते रविकिरण माने यांच्या घरी रात्री 10 वाजता सागर सदाशिव खोत व त्यांच्या चार बगलबच्चांनी घुसखोरी केली.. माने यांना शिवीगाळ करत “तु राजु शेट्टी चं लय काम करतो,मोर्चाला बोलवुनबोलवुन लोकं नेतो,सदाभाऊवर बोलतो” म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.. व गावात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.. याबाबत आमचे रविकिरण माने यांनी कासेगाव ता. वाळवा येथिल पोलिस ठाण्यात तक्रार दिली असुन तपास सुरू आहे..
परंतु यातुन एक अधोरेखित होतं आहे ते म्हणजे राजु शेट्टी साहेबांच्या पाठिशी लोकांचं मिळत असलेलं प्रेम लोकांचा उदंड पाठिंबा,आणि पुन्हा लोकांना राजु शेट्टींच्या कार्याची झालेली जाणीव यांमुळेच या लोकांच्या पायाखालील वाळु सरकु लागली आहे.. आपली आमदारकीची मुदत संपत आलीय आणि इकडे राजु शेट्टी पुन्हा नव्या जोमाने ऊसपट्ट्यात गावागावात लोकांच्या हृदयांत पुन्हा अढळ स्थान निर्माण करत आहेत यामुळेच या लोकांना कुठेतरी पोटशूळ उठला आहे..
शेट्टींची जातीयवादी प्रतिमा निर्माण करता करता त्यांनी स्वतःची प्रतिमा गावगुंड अशी तयार करवुन घेतली आहे.. रविकिरण माने यांच्यावर हल्ला करणार्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी गृह विभागाला मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी करतो..
Raju Shetti Raju S
