Homeकोंकण - ठाणेपाणी पूजन करण्यापूर्वी जलसंपदा. - मंत्रीमहोदयानी धरणग्रस्तांना वेळ द्यावी.आंबेओहळ धरणग्रस्तांची ना जयंत...

पाणी पूजन करण्यापूर्वी जलसंपदा. – मंत्रीमहोदयानी धरणग्रस्तांना वेळ द्यावी.आंबेओहळ धरणग्रस्तांची ना जयंत पाटील यांना विनंती. (पाणी पूजनाला आमचा विरोध नाही.- धरणग्रस्त)

आजरा. प्रतिनिधी. ०७

आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरणाचा पाणी पुजन सोहळा दि. ९ रोजी महाविकास आघाडीच्या नेत्याच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर धरणग्रस्तांनी विनंती केली आहे.
जलसंपदामंत्री यानी पाणी पूजन सोहळाच्या अगोदर धरणग्रस्तांची भेट घ्यावी अशी विनंती होत आहे.
राज्यात शंभरहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी असतानाच आंबेओहळ धरणात यावर्षी पाणी अडविले आहे.
या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईल की नाही याची कोणतीच खात्री नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्यामध्ये अस्वस्थता आहे. पुनर्वसनाचे प्रश्न तसेच असताना पाणी पूजनाचा कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गुरुवार दि ९ सप्टेंबर रोजी होत आहे. याबबात प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे पाणी पूजनाला आमचा विरोध नाही.
पण प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याचा कालबध्द कार्यक्रम ठरवून त्याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी निश्चित करावी. अत्यंत प्रागतिक असा पुनर्वसनाचा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या पुरोगामी वारशाला जपत ना जयंत पाटील यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पाणी पूजनाच्या आधी प्रकल्पग्रस्तांशी बैठक करून उर्वरित प्रश्न सुटण्याची खात्री द्यावी इतकीच आम्हा सर्व धरणग्रस्त स्त्री पुरुषांची माफक मागणी आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या बाबत आपण नेहमीच संवेदनशील आहात. आपला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे. पाणी पूजनापूर्वी धरणग्रस्तांचे प्रश्न समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, शिवाजी गुरव, सचिन पावले, शिवाजी येजरे, बजरंग पुंडपळ, सागर सरोळकर, महादेव खाडे इत्यादी प्रकल्पग्रस्तांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.