Homeकोंकण - ठाणेव्यंकटराव हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

व्यंकटराव हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

आजरा.प्रतिनिधी.०५

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती व शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व आजरा तालुक्यातील भैरेवाडी गावचे सुपुत्र ,जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ञ डॉ जे. पी. नाईक यांचा जन्मदिन त्यांच्या प्रतिमा पूजनाने उत्साहात संपन्न झाला.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे शुभहस्ते या थोर शिक्षण तज्ञ विभूतींच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो.
याप्रसंगी श्री. शिंपी डॉ. जे. पी .नाईक यांचे बद्दल आपले विचार मांडले डॉ जे. पी. नाईक म्हणजे साधी राहणी, आदर्शवत कृती तसेच अफाट ज्ञानाने परिपूर्ण असणारे प्रगाड पंडित व्यक्तिमत्व तसेच त्यांनी या ज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी, गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी व त्यांच्या मुलांना कोणत्या पद्धतीचे शिक्षण द्यावे याच्यावर सतत विचार करून त्या संदर्भात आपले विचार जगाच्या कानाकोपऱ्यातल्या देशांपर्यंत पोहोचवून तशा प्रकारची कृती अमलात आणावयास सगळ्या जगाला त्यांनी भाग पाडलं.. म्हणूनच त्याला जागतिक कीर्तीचे शिक्षण तज्ञ म्हणतात. आयुष्यभर शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा विनियोग विद्यार्थ्यांच्या आणि देशातल्या भावी नागरिकाच्या उन्नतीसाठी कसा होईल याचाच विचार करणारे जे‌ पी .नाईक साहेब यांचा आज जन्मदिन… त्यांनी व्यंकटराव हायस्कूलच्या सुरुवातीच्या संस्थान काळात प्रशालेच्या उभारणीवेळी 1956 मध्ये संस्थेच्या रजिस्ट्रेशन कामात मोलाचं सहकार्य केलं आहे .
त्याचप्रमाणे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही आपले संपूर्ण जीवन शिक्षणासाठी व्यतीत केले… या शिक्षणाच्या आणि उच्च विचाराच्या आधारानेच ते देशाचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदाच्या सर्वोत्तम स्थानी पोहोचले. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो.
माजी प्राचार्य व संस्थेचे संचालक श्री सुनील देसाई यांनीही डॉ. जे पी नाईक व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगून जीवनामध्ये शिक्षक आपल्याला चांगला मार्ग कसा दाखवतो आणि त्या मार्गावरून जाण्यासाठी मार्गदर्शनही करतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात गुरूला अनन्य साधारण महत्व आहे. असे सांगितले.
प्राचार्य श्री एस बी गुरव यांनी सांगितले की, गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा आपण या डॉ जे पी नाईक व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण घेतले. आणि स्वतः शिक्षकी पेशा प्रामाणिक जपत असताना जास्तीत जास्त समाजसेवा कशी करता येईल गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येतील याकडेही लक्ष देत आहे. आपल्या आयुष्याला क्षणोक्षणी आकार ,आधार आणि अमर्याद ज्ञान देणार्‍या सर्व गुरुजन वर्गाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी श्री आर.जी. कुंभार, श्री शिवाजी पारळे, श्री कृष्णा दावणे, श्री व्ही.ए. चौगुले, श्री पी व्ही पाटील, श्रीम ए.के. गुरव, श्रीम. ए.बी. पुंडपळ, श्री एस एस गिलबिले, श्री सुनील पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.