Homeकोंकण - ठाणेकेंद्राकडून कोरोना निधी बंद. -15 हजार कोरोना योद्धे झाले बेरोजगार!.

केंद्राकडून कोरोना निधी बंद. -15 हजार कोरोना योद्धे झाले बेरोजगार!.

नवी दिल्ली. वृतसंस्था.

केंद्र सरकारने निधी बंद केल्याने कोरोनाकाळात आरोग्यसेवेत भरती केलेले राज्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 15 हजार कंत्राटी कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

निधी नसल्याने कोरोना उपचार केंद्र, समर्पित कोरोना आरोग्य केंद्र आणि समर्पित कोरोना रुग्णालय या तीन संस्थांमध्ये भरती केलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

केंद्र सरकारकडून आपत्कालीन कोरोना प्रतिसाद योजना 1 आणि 2 या संवर्गातील मनुष्यबळास मंजुरी न मिळाल्याने या सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे विविध जिल्हा परिषदांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.या योजनेचा निधी केंद्राकडून आला नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने जिल्हा परिषदांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून कडून ‘ईसीआरपी’ एकमध्ये नेमण्यात आलेल्या मनुष्यबळास मंजुरी न मिळाल्याने तालुका स्तरावर कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा 31 या समाप्त करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.