आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२५-२६ चे रू.१००/- प्रमाणे अंतीम ऊस बिल जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला एफ.आर.पी.प्रमाणे देय ऊस दर रू.३१९४/- असतानांही यापूर्वी प्रतिटन रू.३४००/- प्रमाणे ऊस बिल अदा केले आहे. यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेस गत हंगामावेळी आणखीन जादा प्रतिटन रू.१००/- देण्याचे कारखाना संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनाचा विचार करून नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत कारखान्याचे मा.अध्यक्ष यांनी जाहीर केले प्रमाणे येत्या दिपावली सणासाठी गतवर्षीच्या ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रतिटन रू.१००/- प्रमाणे होणारी रू. ३ कोटी ६ लाख ८८ हजार इतकी ऊस दराची अंतीम हप्त्याची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणेत आली आहे.
ऊस पुरवठादार शेतक-यांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम उचल करावी. आजरा कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला एकूण रू.३५००/- प्रति मे.टन म्हणजेच एफ.आर.पी.पेक्षा प्रतिटन रू.३०५/- प्रमाणे रू. ९ कोटी ३६ लाख इतकी जादा रक्कम अदा केली आहे.
या वर्षीचा गळीत हंगाम सन २०२६-२७ करीता कारखाना सक्षम ओव्हरहोलींग करून गळीतासाठी सज्ज आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी परजिल्ह्यातील व लोकल अशी ३६४ यंत्रणा बांधविलेली असून या यंत्रणेमार्फत कारखान्याकडे करार केलेला संपूर्ण ऊस वेळेत उचल करून गाळप करणेचे तसेच गाळप केलेल्या ऊसाचे बिल कोल्हापूर जिल्हा मध्य.सह.बँकेच्या सहकार्याने वेळेत अदा करणेचे नियोजन केले आहे.
तालुक्यातील व लगतच्या गडहिंग्लज, चंदगड व आंबोली भागातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपण पिकविलेला संपूर्ण ऊस आजरा साखर कारखान्यास गळीतास पाठवून कारखान्याचे ४ लाख मे.टनाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यांस सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव देसाई यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन अनिल फडके, कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारुती घोरपडे, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे,राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील ( आजरा )अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री.रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री.दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस.के.सावंत व अधिकारी उपस्थित होते.
