Home कोंकण - ठाणे “आजरा येथे भरदिवसा घरफोडी. ( साडेचार लाखांचे दागिने लंपास.)

“आजरा येथे भरदिवसा घरफोडी. ( साडेचार लाखांचे दागिने लंपास.)

Oplus_131072

“आजरा येथे भरदिवसा घरफोडी. ( साडेचार लाखांचे दागिने लंपास.)

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद आजरा पोलिसांत दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिरेवाडी येथील संजय दत्तात्रय इंचनाळकर (वय ४६, व्यवसाय शेती) यांच्या घरी दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या सहा अंगठ्या, सोन्याची लाखी, सोन्याची पोटमाळ, सोन्याची कर्णफुले, सोन्याचे मणी, लहान मुलांचे सोन्याचे दागिने, सोन्याच्या कानातील बुगड्या तसेच चांदीचे दोन करदोडे व बिंदल्या यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची अंदाजे किंमत ४ लाख ५५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३६ वाजता आजरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (३) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, आजरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली सरवदे यांच्यासह डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन तपास केला.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.