आजरा येथील डॉ. अनिल देशपांडे यांना IMA प्रेसिडेंट अॅप्रिसिएशन अवॉर्ड जाहीर.
आजरा. प्रतिनिधी.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या आजरा शाखेचे सेक्रेटरी डॉ. अनिल माधवराव देशपांडे यांना वैद्यकीय व्यवसायातील समर्पित सेवेबद्दल तसेच मातृसंस्था इंडियन मेडिकल असोसिएशनसाठी विविध स्तरांवर केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल IMA प्रेसिडेंट अॅप्रिसिएशन अवॉर्ड 2025-26 साठी निवड करण्यात आली आहे.
सदर पुरस्कार MASTACON कॉन्फरन्स – 2026, IMA House, नागपूर* येथे दि. 13 नोव्हेंबर 2026 रोजी प्रेसिडेंट, IMA महाराष्ट्र यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. अनिल देशपांडे हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सहकार व शिक्षण क्षेत्रातही सक्रिय असून, त्यांनी आजरा नागरी सहकारी बँकेचे माजी चेअरमन, आजरा सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन आणि जनता एज्युकेशन सोसायटीचे सीईओ म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
