Homeकोंकण - ठाणेमुंबई ब्रेकिंग: शिवतीर्थावर मंगळवारी शिवसेनेचा विराट दसरा मेळावा, संविधान रक्षणाची धगधगती मशाल...

मुंबई ब्रेकिंग: शिवतीर्थावर मंगळवारी शिवसेनेचा विराट दसरा मेळावा, संविधान रक्षणाची धगधगती मशाल पेटणार

🔴मुंबई ब्रेकिंग: शिवतीर्थावर मंगळवारी शिवसेनेचा विराट दसरा मेळावा, संविधान रक्षणाची धगधगती मशाल पेटणार

मुंबई :- प्रतिनिधी.

शिवसेनेचा पारंपारिक विराट दसरा मेळावा येत्या मंगळवारी दि. २० ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे.

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उठलेले देशव्यापी वादळ, विद्यार्थ्यांची आंदोलने, दुष्काळी परिस्थिती आणि भाजप सरकारचा मनमानी कारभार या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून संविधान रक्षणाच्या लढ्याची मशाल यावेळी पेटणार आहे. देशावर आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा शिवसेना आक्रमक झाली. आज सत्ताधाऱ्यांच्या जुलमी कारवायांनी विद्यार्थी, तरुणवर्ग आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला आहे, देशात तिरंगा फडकवणेही गुन्हा ठरत आहे, संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरली आहे.

💥मेळाव्याची जय्यत तयारी सुरू.

शिवतीर्थावर भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. मेळाव्याचा टीझरही प्रसिद्ध झाला आहे. ‘मंगळवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या दसरा मेळाव्याला संविधान रक्षणाची धगधगती मशाल बनून या, वाजतगाजत गुलाल उधळत या’ असे आवाहन टीझरद्वारे करण्यात आले आहे. सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

💥जेन झी मध्येही उत्सुकता.

NEET आणि MPSC परीक्षा फुटीविरुद्ध दिल्लीच्या जंतर-मंतरवर आणि पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला शिवसेनेने सक्रिय पाठिंबा दिला होता. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेने विजयी मेळावाही घेतला होता.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तिरंगा आंदोलनही केले गेले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेने प्रयत्न केले होते. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात जेन झी (Gen Z) चीही मोठ्या संख्येने उपस्थिती असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.