सहकाराला सत्तेची जोड असल्याशिवाय सहकार चालत नाही.- गोकुळ दूध संघाचा निकाल २५/ ० असेल.- पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर.( आजऱ्यात महायुतीचा ठराव धारकांचा मेळावा संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.

सहकाराला सत्तेची जोड असल्याशिवाय सहकार चालत नाही. यामुळे सर्व ठराव धारकांनी देवदर्शन ला जावे. निकाल २५/ ० असेल आजऱ्यात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारार्थ महायुतीचा ठराव धारकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.
स्वागत व प्रास्ताविक युवा नेते अभिषेक शिंपी यांनी केले.
पुढे बोलताना नामदार आबिटकर म्हणाले राज्यात व केंद्रात महायुतीची सत्ता आहे. सहकाराला केंद्राची व राज्याची जोड असावी लागते. विरोधक चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवत आहेत.

त्यांना बुद्धिभेद केल्याशिवाय पर्याय नाही. अपप्रचार करत आहेत. महायुतीचे पॅनलचे सर्व संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कारण हे सभासदांच्या हिताचे पॅनल आहे म्हणून छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला सर्व ठराव धारकांनी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे व यामध्ये आजरा तालुक्यातील ठराव धारकांचा सिंहाचा वाटा असावा. व असणार आहे. कप बशी हे चिन्ह सर्व ठराव धारकापर्यंत पोहोचली आहे. लवकरच आजरा शहरातील विकास कामाचा उद्घाटन व उर्वरित कामे पूर्ण होतील यासाठी काम केले जाईल. व सर्व ठराव धारकांनी पॅनल मतदान करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
यावेळी विष्णुपंत केसरकर, विठ्ठल उत्तुरकर, आदित्य रेडेकर, सुनील पाटील इंद्रजीत देसाई, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जि.प माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, भिकाजी गुरव, प्रभाकर खांडेकर, राजू सावंत, विलास पाटील, सौ. भारती डेळेकर सौ. सविता जाधव, विठ्ठल उत्तुरकर, परशुराम बामणे, अनिरुद्ध केसरकर, अलिफ सोनेखान, सौ. सुषमा पाटील, असिफ पटेल, सुरेश हाडगे, सतिश फडके, सूर्यकांत गुरव, सौ. सुनिता रेडेकर, माजी. जि. प.सदस्या अमित खडेकर, विजय थोरवत, संतोष भाटले, सुनील देवेकर, शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक सह ठराव धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी पारळे यांनी सूत्रसंचलन केले. रणजीत सरदेसाई यांनी आभार मानले.
