🟡आजऱ्यात उमेद महिला ग्रुप आयोजित महा दांडियाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
( नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते महा दांडिया २०२६ चा शुभारंभ.)
🟡श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.
🟡आजऱ्यात उमेद महिला ग्रुप आयोजित महा दांडियाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आजरा, प्रतिनिधी.

आजरा येथे उमेद महिला ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उमेद महा दांडिया २०२६’ या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवरात्रोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दांडियाचा आनंद लुटला. महिलांना एकत्र आणणे, त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण करणे आणि गरजू महिलांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उमेद महा दांडिया २०२६ चा शुभारंभ मा. अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. धनश्री मानसिंग देसाई यांनी उमेद महिला ग्रुपच्या कार्याची माहिती दिली. महिलांनी केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्यावा, या भावनेतून ग्रुप कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील एखादी महिला अडचणीत असेल, तर तिला आवश्यक ती मदत करण्यासाठी ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी अधिकाधिक महिलांनी उमेद महिला ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोक अण्णा चराटी, योगेश पाटील, डॉ. सौ. स्मिता कुंभार, निशा चांद सुरेखा भालेराव, नूरजाहा सोलापूरे, श्रद्धा देसाई, राजश्री पाटील, मुग्धा चराटी, राजलक्ष्मी देसाई आणि सौ. अनुसया पाटील तसेच ज्योत्स्ना चराटी उपस्थित होते.
उमेद महिला ग्रुपच्या आयोजक गीताताई पोतदार आणि भैरवी सावंत यांनी महिलांनी संघटित होऊन सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन केले. महिलांच्या एकजुटीतून समाजोपयोगी कार्याला चालना मिळू शकते. गरजू महिलांना मदत करणे, सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यासाठी उमेद महिला ग्रुप यापुढेही विविध उपक्रम राबविणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सौ. रचना होलम यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या आजरा पोलीस ठाणे व आजरा हायस्कूल, आजरा यांचे सौ. माधुरी पाचवडेकर यांनी आभार मानले.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उमेद महा दांडिया २०२६ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सांस्कृतिक आनंदासोबतच महिलांची एकजूट, सामाजिक जाणीव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणारा हा उपक्रम आजऱ्यातील महिलांसाठी विशेष आकर्षण ठरला.
🟡श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा च्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ संचालक बंडोपंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी उपस्थीतांचे स्वागत करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिवसभर सलग वाचनाचा उपक्रम “वाचनध्यास…” आयोजित करणेत आला. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उर्दु प्राथमिक विद्यामंदिर, कुमार भवन विद्यामंदिर, पं. दिनदयाळ विद्यालय, आजरा महाविद्यालय, ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचे विद्यार्थी व ग्रंथालयाचे वाचक, सभासदांनी या उपक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेऊन वाचन केले. या उपक्रमासाठी निसार लाडजी, रिजवान माणगावकर, शुभांगी पेडणेकर, संतोषी कुंभार, शुभांगी निर्मळे, संतोष लाड, दयानंद भंडारी, अश्विनी परीट यांचे सहकार्य लाभले.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कलकत्ता यांचेकडून वाचनालयास एक संगणक संच व प्रिंटर भेट मिळाला आहे. या संगणकाचे पूजन उपाध्यक्षा विद्या हरेर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद सुरेश पत्की, शिवाजीराव पाटील, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक विजय राजोपाध्ये, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, सौ. सुचेता गडडी, शुभांगी सोनुले, सदिच्छा चौगुले, सानिका गुंजाळ, सविता वायल, समिक्षा वाक्कर, दिपा कानडे, सानिया काकतीकर, उपस्थित होते. ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले वाचनालयाचे कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी आभार मानले .
