Homeकोंकण - ठाणे"महापौर" - बाई.आ. देखे जरा किसमें है कितना दम. - उंची आहे...

“महापौर” – बाई.आ. देखे जरा किसमें है कितना दम. – उंची आहे एवढे बोला. – व झेपेल इतके बोला. मंदिरे उघडा.- मनसेचा इशारा

मुंबई. प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील मंदिरे उघडली नाहीत तर ‘आम्ही घंटानाद आंदोलन करू’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मात्र, राज ठाकरेंच्या इशाऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार उत्तर दिल आहे.घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करु नका..’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता किशोरी पेडणेकर यांच्या उत्तरला मनसे कडून देखील जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी या संदर्भातील एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

‘महापौर बाई ,सरकार तुमचे सरकार आहात घरात बसून आहेत त्यांना सांगताय का बिळात लपून बसले म्हणून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक कठीण काळात रस्त्यावर होते आणि प्रत्येक वेळी असूच,

राहिला प्रश्न नाद करायचा नाही तर, ‘आ देखे जरा किसमे है कितना दम हो’. उगीच काही बरगळू नका आपल्या उंची एवढेच बोला झेपेल तेवढेच , ज्या पदावर आहे त्याचे भान राहिले तरी खूप झाले. अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.