Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र३२ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सुभेदार मेजर निळकंठ हासबे सेवानिवृत्त( मडिलगे गावात ढोल-ताशांच्या...

३२ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सुभेदार मेजर निळकंठ हासबे सेवानिवृत्त( मडिलगे गावात ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या जल्लोषात भव्य स्वागत.)

३२ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सुभेदार मेजर निळकंठ हासबे सेवानिवृत्त
( मडिलगे गावात ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या जल्लोषात भव्य स्वागत.)

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे, ता. आजरा येथील भारतीय सैन्य दलात तब्बल ३२ वर्षे प्रदीर्घ, शिस्तबद्ध व समर्पित देशसेवा बजावून दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सुभेदार मेजर श्री. निळकंठ ईश्वरा हासबे हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवास्पद देशसेवेबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत व सन्मान करण्यात आला.
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या जीवनातील अमूल्य ३२ वर्षे समर्पित करणाऱ्या श्री. निळकंठ हासबे यांच्या सेवेला ग्रामस्थांनी मनःपूर्वक सलाम केला. त्यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्त, त्याग आणि देशसेवेची निष्ठा ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
मडिलगे बसस्थानकापासून संपूर्ण गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. महिलांच्या लेझीम पथकाने, व मुलींच्या ढोल पथकाने आकर्षक सादरीकरण करत मिरवणुकीची शोभा वाढवली. देशसेवेचा गौरव, गावकऱ्यांचा उत्साह आणि आपुलकीचा स्नेह यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले.


यावेळी ग्रामपंचायत सरपंच बापू निऊगरे, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, तसेच नातेवाईक पाहुणेमंडळी हितचिंतक मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. मेजर सुभेदार निळकंठ हासबे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान, समृद्धी व यश लाभावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
( देशसेवेचा मान, मडलगेचा अभिमान;
श्री.‌ हासबे यांच्या कार्याला गावाचा सलाम! )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.