Homeकोंकण - ठाणेखुशखबर. - महामंडळवरील नियुक्त्या होणार १५ दिवसात. - महाविकास आघाडी सरकार.

खुशखबर. – महामंडळवरील नियुक्त्या होणार १५ दिवसात. – महाविकास आघाडी सरकार.

मुंबई. प्रतिनिधी.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून जवळपास २१ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी राज्यातील विविध महामंडळे आणि समित्यांवरील नेमणूका प्रलंबित असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे.या नाराजीचा फटका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये बसू नये म्हणून विविध महामंडळावरील आणि समित्यांवरील नियुक्त्या करून येत्या १५ दिवसात नावांची घोषणा केली जाणार आहेत.

राज्यात भाजपचे सरकार जावून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.या सरकारला सुमारे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यास आला असला तरी राज्यात असलेल्या विविध महामंडळावरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत.यामुळे तिन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे समजते.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून महामंडळावरील नियुक्त्या येत्या १५ दिवसात करण्यात येवून त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नेते,मंत्री आणि आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.जवळपास तीन तासांहुन अधिक चाललेल्या बैठकीत निवडणुका, पक्षबांधणी,महामंडळावरील नियुक्त्या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे.मुंबई, ठाणे, पुण्यासह १७ महानगरपालिका,27 जिल्हा परिषदा ३०० नगरपालिका, २९५ पंचायत समित्या आणि २१ जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे,त्यामुळे पवार यांनी मंत्र्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Previous article
विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांचे दुःखद निधन. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानसभेचे माजी निवृत्त प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते.भास्करराव शेट्ये यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याची परीक्षा देऊन वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगांव, पालघर, पणजी आदी ठिकाणी न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांची महाराष्ट्र विधानसभेचे प्रधान सचिव म्हणून निवड झाली. विधानसभा सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकींग लोकपाल म्हणून निवड झाली. बँकींग लोकपाल म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्ती नंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते.भास्करराव शेट्ये हे गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता. निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते.- न्यायप्रिय व शिस्तप्रिय म्हणून ते प्रसिद्ध होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांना जवळून सहवास लाभला होता. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचेमागे त्यांची पत्नी शामल, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मुंबई हायकोर्टाचे ऍड. सचिंद्र शेट्ये तसेच त्यांचे धाकटे चिरंजीव तारांगण क्षेत्रात काम करणारे अभिजित शेट्ये, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.