Homeकोंकण - ठाणेसुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.( '२०१७ व २०१९ च्या कर्जमाफीत वंचित शेतकऱ्यांना...

सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.( ‘२०१७ व २०१९ च्या कर्जमाफीत वंचित शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर योजनेत समाविष्ट करा’.)

सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
( ‘२०१७ व २०१९ च्या कर्जमाफीत वंचित शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर योजनेत समाविष्ट करा’.)

मुंबई. – प्रतिनिधी.

भाजपा नेते व माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

पत्रातील महत्वाचे मुद्दे:

  1. विषय :-
    सन 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व सन 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून न्याय द्यावा.
  2. समस्या काय?:

चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी या दोन्ही योजनांमध्ये पात्र ठरले होते. परंतु निधी उपलब्धता, तांत्रिक त्रुटी, आधार संलग्नीकरणातील समस्या, बँकांच्या प्रशासकीय विलंबामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

  1. परिणाम: शासनाच्या निर्णयावर विश्वास ठेवून कर्ज परतफेडीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आज मोठा आर्थिक भार निर्माण झाला आहे. व्याज, दंडामुळे कर्जाची रक्कम वाढली आहे. अनेकांना बँकांकडून “थकबाकीदार” म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.
  2. मुनगंटीवारांची मागणी : –
    • वरील दोन्ही योजनांमध्ये पात्र परंतु विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची विशेष पडताळणी करावी.
    • त्यांना तातडीने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून लाभ मंजूर करावा.
    • विलंबामुळे वाढले व्याज, दंड व इतर आकारणी शासनाच्या जबाबदारीवर माफ करावी.
  3. तसेच, “महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे राज्य आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या प्रकरणाचा संवेदनशीलतेने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.” असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.