🟣 इंधन दरवाढी विरोधात आजरा उबाठा सेनेचा बैलगाडी मोर्चा.
🛑साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल..
( शक्तीपीठाच्या विरोधात तालुक्यातील शेतकरी एकवटला..)
🟣 इंधन दरवाढी विरोधात आजरा उबाठा सेनेचा बैलगाडी मोर्चा.
आजरा.- प्रतिनिधी.

इंधन दरवाढीच्या विरोधात आजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढणार असल्याचे आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कि सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील जनतेसाठी काम करत असून गेल्या दोन तीन दिवसांमध्ये ३ रु पेट्रोल वाढ व घरगुती गॅस, डिझेल वाढ, सी.एन.जी गॅस वाढ करुन सर्व सामान्य माणसांचे आर्थिक नुकसाना बरोबर जिवनावश्यक वस्तूंचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दोन वेळचे अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान व देशातील मंत्री पन्नास साठ गाड्यांचा ताफा घेऊन परदेश दौऱ्याबरोबर राज्याचे दौरे करत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेला पेट्रोल व डिझेल कमी वापरण्याचे सल्ले देत आहेत. त्याच्या निषेधार्थ शुक्रवार सोमबार दि. २९/०५/२०२६ रोजी ११.०० वा. संभाजी चौक येथे शिवसेनेच्या वतीने बैलगाडी सहित रास्ता रोखो करण्यात येणार आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संभाजी पाटील उपजिल्हा प्रमुख, युवराज पोवार ता. प्रमुख, समीर चाँद शहर प्रमुख, सागर नाईक शहर प्रमुख, संजय येसादे ता. संघटक, सुनिल डोंगरे विभाग प्रमुख, विलास किल्लेदार उपता. प्रमुख, दिनेश कांबळे शेतकरी सेना ता. प्रमुख
सुयश पाटील युवासेना, महेश पाटील युवासेना उपजिल्हा, बिलीस लतीफ शहर अध्यक्ष हिंद भारती सेना अध्यक्ष
अमित गुरव युवासेना उप. ता. प्रमुख सह पदाधिकारी शिवसैनिक यांच्यासह आहेत.

🛑साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल..
( शक्तीपीठाच्या विरोधात तालुक्यातील शेतकरी एकवटला..)
आजरा – प्रतिनिधी.

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजरा तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसीलदार आजरा यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना हरकती सादर केल्या. दि. २६ रोजी संघर्ष समितीचे कॉम्रेड संपत देसाई व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर पेरणोली, मसोली, एरंडोळ, देवर्डे, वेळवटी, खानापूर इत्यादी बाधित गावातले शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. “एकच जिद्द शक्तीपीठ रद्द” अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आज सादर केल्या.
वैयक्तिक हरकतीचे अर्जात आपल्या शेतजमिनीसह या रस्त्यामुळे पाण्याचे निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले जाणार आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले जाऊन जमिनी कोरडवाहू होणार आहेत. पर्यावरणाची न भरून येणारी विपरीत परिस्थिती तयार होणार आहे. शेतकरी उध्वस्त होणारच पण याबरोबरच इथला निसर्ग आणि पर्यावरण ही उध्वस्त होणार आहे. कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. हरकतीचे अर्ज एकत्र करून गाववार स्वतंत्र याद्या बनवून तहसीलदार यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ कारकून त्यांच्याकडे हरकतीचे अर्ज देण्यात आले. यावेळी सुधीर देसाई,भीमराव माधव, सर्जेराव देसाई, चंद्रकांत गुरव, किरण गुरव, बाळू जाधव, निवृत्ती कांबळे, दिपाली गुरव, सुभाष देसाई, निवृत्ती फगरे, शंकर पाटील, दिनेश कांबळे, बाळू पाटील, छाया गुरव, शंकर हळवणकर यांच्यासह शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





