Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपेरणोली - गारगोटी रस्त्याचे रखडलेले काम पुर्ण करा - ग्रामस्थांचे निवेदन.🛑गिरणी कामगारांना...

पेरणोली – गारगोटी रस्त्याचे रखडलेले काम पुर्ण करा – ग्रामस्थांचे निवेदन.🛑गिरणी कामगारांना मुंबईत जागा मिळविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू. ( १० मार्च २०२६ रोजीच्या मोर्चाचे प्रचंड यश.)

🛑पेरणोली – गारगोटी रस्त्याचे रखडलेले काम पुर्ण करा – ग्रामस्थांचे निवेदन.
🛑गिरणी कामगारांना मुंबईत जागा मिळविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू. ( १० मार्च २०२६ रोजीच्या मोर्चाचे प्रचंड यश.)

🛑पेरणोली – गारगोटी रस्त्याचे रखडलेले काम पुर्ण करा – ग्रामस्थांचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

पेरणोली गारगोटी रस्त्याचे पेरणोली ते नावलकरवाडी पर्यंतचे काम बरेच दिवसांपासून काम थांबले असून रस्त्यावर पाणी साचून अपघात होत आहेत. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाचा देखील आपण प्रतिसाद दिला नाही. सद्यस्थिती वळवाचा पाऊस पडत आहे. काही दिवसात पावसाळा चालू होणार तत्पूर्वी आपण कामे पूर्ण करावेत. यामुळे येणाऱ्या चार-पाच दिवसात उर्वरित रस्त्याचे काम चालू करावे. होत असलेले अपघात थांबावेत याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर युवराज लोंढे, स्वप्निल फगरे, राजेंद्र भोसले, औदुंबर हवालदार, संजय दळवी, संजय जाधव शिवाजी कांबळे पांडुरंग दोरुगडे, सागर सावंत सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

🛑गिरणी कामगारांना मुंबईत जागा मिळविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू.
( १० मार्च २०२६ रोजीच्या मोर्चाचे प्रचंड यश.)

मुंबई.- प्रतिनिधी.

गिरणी कामगारांचे एक पाऊल पुढे जात शासकीय पातळीवर जागा शोधण्यासाठी प्रयत्न करणारा जी आर शासनाच्या वतीने आज दि. १८ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर जी आर शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगार संघटनांच्या मागणी नुसार बृहन्मुंबई मध्ये गिरणी कामगारांना घरे उपलब्ध देण्याबाबत विविध पर्याय तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अप्पर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून गिरणी कामगारांना बृहन्मुंबई मध्ये घरे उपलब्ध उपलब्ध करण्याचे प्रयत्न करणारा जी आर शासनाच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. तरीही गिरणी कामगारांनी गाफील राहून चालणार नाही. यापुढे जागरूक पणे तिव्र आंदोलन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबतची माहिती कॉम्रेड उदय भट, बी के आंब्रे, विजय कुलकर्णी, अतुल दिघे, दत्तात्रय अत्याळकर यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.