🛑शक्तिपीठ महामार्गाला विरोध – संघर्ष समितीचा आजऱ्यात मोर्चा.( तहसीलदार यांना निवेदन.)
🟣टोल नाका कसा चालू करणार
टोल वसुलीला – विरोध कायम.-
आजरा शिवसेनेचे निवेदन.
🟣बी – बियाणे व खतसाठा आढावा बैठकी – १९ मे रोजी कृषी विभागाची बैठक
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
🛑शक्तिपीठ महामार्गाला विरोध संघर्ष समितीचा आजऱ्यात मोर्चा.( तहसीलदार यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.

सरकार गरज नसलेला गोवा ते नागपूर असा ८०५ किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचे जाहीर करून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणारा या रस्त्यासाठी ८६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार होते. पण त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हा या शक्तीपीठ मार्गातून वगळतो असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. याला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध झाला संघर्ष समितीच्या माध्यमातून कोल्हापुरातील ६० गावातील शेतकरी एकत्र आले व या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. पाचपट बाधित शेतकऱ्यांना रक्कम देतो असे शेतकऱ्यांना अमिष दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्याला आमचा विरोध आहे. चंदगडचे आमदार तुम्ही शक्तिपीठाचे स्वप्न बघू नका. जर शेतकऱ्यांच्या बाजूने नसाल तर जनता तुमच्या सोबत नसेल.
या शक्तिपीठाला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी विरोध करून हा शक्तीपीठ मार्ग हाणून पाडावा. यामध्ये फक्त कोणत्या एका पक्षाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांचा विरोध नसून सर्वांनी एकत्र राहून या दोन्ही राष्ट्रवादी, सह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष या आंदोलनात पुढे असतील कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करतील अशी आंदोलकांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी आमदार के पी पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, काँ. संपत देसाई, तानाजी देसाई, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, युवराज पोवार सह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरा पोलीस स्टेशन वतीने मोर्चाला बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
🟣टोल नाका कसा चालू करणार
टोल वसुलीला – विरोध कायम.-
आजरा शिवसेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

टोलचे काम सुरु न करणेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संकेश्वर ते बांधा राष्ट्रीय मार्गावर आजरा एम.आय.डी.सी. जवळ असणाऱ्या टोल वसुली बाबत खालील मुद्द्द्यांचे स्पष्टीकरण झाल्याशिवाय टोल नाक्यावर सुरु असणारी कामे त्वरित बंद करावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल. यामधील निवेदनात दिलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे. १) या टोल वसुली मध्ये आजरा तालुक्यातील खाजगी व व्यावसायिक वाहन धारकांना टोल माफी कशा पद्धतीने व किती वर्षा पर्यंत राहणार. २) आजरा तालुक्यातील हद्दीमध्ये रस्त्या लगत असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यासाठी काय सोय करणार ३) अजूनही काही रस्त्या लगत असणाऱ्या गावांना बस थांबे बांधलेले नाहीत ते कधी पर्यंत बांधणार ४) आजरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील पावसाचे पाणी साचते त्याचे नियोजन काय करणार ५) पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी हा टोल नाका किटवडे येथे स्थलांतरित करणार असे वक्तव्य केलेलं होते. त्याबाबत पुढे काय झालं यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावावी.६ ) आजरा शहरातील लैंड ओहोळ च्या पुला संदर्भात काय निर्णय घेणार ७) आजरा साखर कारखान्याच्या कामगारांची वाहने व उसाच्या वाहनांना टोल मुक्ती देणार का?
वरील सर्व मागण्यांचे लेखी उत्तर मिळेपर्यंत टोल वसूलीसाठी सुरु असलेले काम त्वरित थांबवावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने काम बंद पाडण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
🟣बी – बियाणे व खतसाठा आढावा बैठकी – १९ मे रोजी कृषी विभागाची बैठक
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आजरा.- प्रतिनिधी.
बियाणे व खतसाठा आढावा बैठक खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने खत, बियाणे उपलब्धते बाबत आढावा बैठक आयोजित करणेत आली आहे.
त्यानुसार मंगळवार दि १९/०५/२०२६ रोजी ११.०० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा येथे सदरची बैठक आयोजित करणेत येत आहे. या बैठकीला अधिनस्त उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांना सदर बैठकीला योग्य त्या माहितीसह उपस्थित रहाणेच्या तालुका कृषी अधिकारी, आजरा
व मंडळ कृषी अधिकारी, उत्तूर/आजरा यांनी आवाहन केले आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे.
