आजरा. प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे खेडे – मुगुसवाडी सरपंच यांचे विरोधात अविश्वास ठराव उपसरपंच संगिता शिंदे सह आठ सदस्य यांनी तहसीलदार आजरा, यांचेकडे सादर केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या अविश्वास ठराव बाबत सचिव ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांना मार्गदर्शन करण्यात आले होते यावर उपसचिव महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडील प्राप्त झालेले सर्वांच्या प्राप्त पत्रानुसार जिल्हाधिकारी यांनी अविश्वास ठराव संमत झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विशेष सभा ग्रामसभा योजनाचे आदेश काढावेत तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या दिनांका पासून दहा दिवसांच्या आत गटापेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या अधिकार या मार्फत विशेष ग्रामसभा आयोजन करावे असे सुचवले आहे माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर मुंबई ग्रामपंचायत अधिकार १९५८ चे कलम ३५ प्रमाणे प्रदान करण्यात आले अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायत खेडे – मुंगूसवाडी तालुका आजरा या ग्रामपंचायत मधील सौ. सरपंच अविश्वास ठराव बाबत विशेष ग्रामसभा दिनांक ९ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे बोलवण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांची नेमणूक नेमणुकी खाली सभा होणार आहे. ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ठरावाच्या सभेची कारवाई पूर्ण करण्याची आहे तसेच covid-१९ च्या नियमाने सदर सभेचे आयोजन करण्यात यावे अशाही सूचना देण्यात आले आहेत याबाबतचे पत्र तहसीलदार आजरा गटविकास अधिकारी आजरा ग्रामपंचायत खेडे मुंगूसवाडी तालुका आजरा यांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आले आहे.
