Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसंजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सभा संपन्न.🟣जनता गृहतारण संस्थेची 359 कोटी...

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सभा संपन्न.🟣जनता गृहतारण संस्थेची 359 कोटी ची उलाढाल माणस जोडणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली संस्था.🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण :- ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा.

🟣संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सभा संपन्न.
🟣जनता गृहतारण संस्थेची 359 कोटी ची उलाढाल माणस जोडणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली संस्था.
🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण :- ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा.

🟣संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सभा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा तहसिलदार कार्यालय आजरा येथे दि. ३०/३/२०२६ रोजी समिर माने तहसिलदार आजरा यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस संजय गांधी निराधार योजना समिती मधील सदस्य शशिकांत सावंत, संतोष चौगले, दशरथ अमृते तसेच म्हाळसाकांत देसाई निवासी नायब तहसिलदार आजरा, विकास कोलते संजय गांधी नायब तहसिलदार आजरा, गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा मुख्याधिकारीसो नगरपंचायत आजरा संजय गांधी विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी संतोष सांगडे, जावेद बागवान यांच्या उपस्थितीत घेणेत आली.
सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकुण ५० लाभार्थ्यांना लाभ मंजुर करणेत आला. तसेच श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेमधील १२१ असे एकुण १७१ लाभार्थ्यांना लाभ मंजुर करणेत आला आहे. शासकिय निकषानुसार सदर मिटींगमध्ये २ श्रावणबाळ १ संजय गांधी योजनेमधील लाभार्थ्यांना अपात्र करणेत करणेत आले.

🟣जनता गृहतारण संस्थेची 359 कोटी ची उलाढाल माणस जोडणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली संस्था.

आजरा.- प्रतिनिधी.

स्वतःचं घरकुल असावं हे प्रत्येक माणसाचं स्वप्नं असत. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी जनता सहकारी गृहतारण संस्था ठामपणे सभासदांच्या पाठिशी उभी आहे. सभासद, कर्जदार व ठेवीदारांशी विश्वासाचं नातं आहे, म्हणूनच संस्थेने आर्थिक वर्षात 359 कोटींचा व्यवसाय केला असल्याची माहिती चेअरमन श्री. मारुती मोरे यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे 122 कोटी 86 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच 73 कोटी 76 लाख रुपयांची कर्जे वाटप केली आहेत. संस्थेची 51 कोटी 13 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. संस्थेचे खेळते भांडवल 151 कोटीचे असुन संस्थेला 64 लाख 55 हजार रु इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती श्री. मारुती मोरे यांनी दिली, गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत, “महाराष्ट्र राज्य “कार्यक्षेत्र मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे व ISO9001: 2015 मानांकन प्राप्त संस्था आहे. संस्थेला सहकार भारती कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. कार्यक्षम व घरपोच सेवा देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) येथे शाखा आहेत, संस्था गृहकर्जासाठी 1 कोटी 50 लाख व प्लॉट खरेदीसाठी रु. 1 कोटी कर्ज देते व सोनेतारण कर्ज या सारख्या विविध गोष्टीसाठी संस्था कर्ज पुरवठा करत आहे. संस्थेकडे SMS सुविधा, लाईट बील भरणा, RTGS / NEFT या सुविधा चालू आहेत. या कामी मुख्य कार्यालय व्हा. चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर, संचालक प्राचार्य, डॉ. अशोक सादळे, दिनकर पोटे, प्रा. आनंद चव्हाण, प्रा. रवींद्र आजगेकर, कृष्णा डेळेकर, युवराज शेटके, प्रो. (डॉ.) तानाजी कावळे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, प्रो. (डॉ.) संजीवनी पाटील, प्रा. सौ. क्रांती शिवणे तसेच सर्व शाखांचे चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार, अरविंद कुंभार शाखाधिकारी व कर्मचारी यांच्यासह सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असल्याचे अध्यक्ष श्री. मोरे यांनी सांगितले.

🛑वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची हंगाम अखेरची संपुर्ण :- ऊस बिले व तोडणी वाहतुक बिले जमा.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सन 2025-26 या हंगामात 105 दिवसात 306880.606 मे. टन ऊसाचे गाळप झाले असुन 363225 क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्याकडे दि. 16.01.2026 ते 16. 02.2026 अखेर गाळप झालेल्या 81701.441 मे.टन ऊसाच्या बिलाची प्रतिटन रू. 3400/- प्रमाणे विनाकपात होणारी रु.27 कोटी 78 लाख व तोडणी वाहतुक बिलाची संपुर्ण रू.2 कोटीची रक्कम मा.ना.हसन मुश्रीफसाहेब वैद्यकिय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई व कोल्हापूर जिल्हा मध्य. सहकारी बँकेच्या सहकार्याने ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली.

सन 2025-26 या संपलेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने ठेवलेले गाळपाचे उदिष्ठ पुर्ण करणे अति पावसामुळे ऊसाच्या उत्पन्नात व साखर उता-यात झालेली घट त्याचबरोबर यावर्षी परभागातील अपुरी आलेली तोडणी यंत्रणा यामुळे शक्य झाले नाही. तरी देखील व्यवस्थापनाने 3 लाख 7 हजारापर्यंत गाळप केलेले आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पश्चिम भागातील अति पावसामुळे निकृष्ट प्रतिचा ऊस परिणामी कारखान्याने जादा खर्च करून गळीतास आणुन शेतक-यांची अडचण दुर केली आहे. कारखान्याचे संचालक मंडळाने येता सन 2026-27 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सक्षम तोडणी वाहतुक यंत्रणा भरणेसाठी करार करणेचे काम सुरू आहेत. पुढील हंगामासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, आंबोली या भागातील ऊस उत्पादक शेतक-यांचे ऊस नोंदी व कराराचे कामही सुरू केले आहे. ज्या शेतक-यांनी अद्याप ऊसाचे करार केले नाहीत. त्यांनी संबंधीत शेती ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत. त्याच बरोबर आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील आजरा कारखान्याकडे काम करू इच्छिणा-या उस तोडणी वाहतुक कंत्राटदारांनी आपल्या वाहन व मजुरांचे तोडणी वाहतुकीचे करार मुदतीत करावेत असे आवाहन चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के. सावंत व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.