Homeकोंकण - ठाणेआजरा हाजगोळी बु. ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्याकडून लाभांश वाटप.

आजरा हाजगोळी बु. ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्याकडून लाभांश वाटप.

आजरा. प्रतिनिधी.२७.

आजरा येथील हाजगोळी बु. ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्याकडून लाभांश वाटप करण्यात आले. कोरोणाच्या गंभीर परिस्थिती व गणेश चतुर्थी च्या तोंडावर मुंबई मंडळाने आज रविवार दिनांक २२ रोजी ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिर येथे सभासदांना लाभांश वाटप कर्यक्रम संपन्न झाला. ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीला साडी साडी नेसून चालू वर्षातील निधन झालेल्या मंडळाचे सभासद गावातील नागरिक नागरिक, देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी बारावी वर्गात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सत्कार करुन लाभांश वाटपाचा योग्य व सभासदांच्या हिताचं घेतलेल्या निर्णयाबद्दल गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. उज्वला येसादे यांनी मंडळातील विद्यमान अध्यक्ष गोंविदराव चौगुले कार्याध्यक्ष प्रकाश कातकर खजिनदार प्रफुल मोहिते, भिकाजी घेवडे, गंगाराम कातकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सभासद संजय येसादे यांनी प्रास्ताविक भाषणात आपले विचार मांडताना गावातील होतकरू लोकांनी गेल्या ५० वर्षांपासून एकत्र येऊन भविष्याचा विचार करून व स्वतःच्या पोटाला चिमटा लावून हे मंडळ उभे केले आहे. आणि यानंतर मंडळाच्या कार्यकरणीने सभासदांच्या जोरावर दप्तरी कामकाज व आर्थिक व्यवहार योग्य रीतीने आज तागायत सांभाळल्यामुळे आज आपण हा लाभांश वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. याची आठवण करून दिली यापुढे मंडळाचे कामकाज प्रगतशील घेऊन घेऊन सभासद सभासदांना याचा लाभ मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव चौगुले यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या कामकाजाबाबत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा केली यावेळी ज्येष्ठ सभासद बंधु भगिनी यांची मोठी उपस्थिती होती. गावाकडून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना मुंबई येथे नोकरी मिळू शकते व मुंबई राहण्यासाठी जागा मिळणे कठीण असते ही खरी वस्तुस्थिती आहे.
पण आपल्या लोकांना मुंबईत गेल्यावर कमी पैशात मंडळाच्या खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था असते तसेच ग्रामपंचायतीने चालू असलेला विकास कामाचा आढावा घेत श्री चौगुले यांनी अभिनंदन करून यापुढे गावासाठी वेळ देऊन जबाबदारी ही विकास कामे करावी आम्ही नेहमी सोबत असल्याची ग्वाही मुंबई मित्र मंडळाने दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भास्कर निकम यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.