Homeकोंकण - ठाणेनारायण राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी काढलेले आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? -...

नारायण राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी काढलेले आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? – महाराष्ट्रात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्या विरुद्ध शिवसैनिक आक्रमक. वरुन सरदेसाई.

मुंबई. प्रतिनिधी. २४

मुंबईत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या जहु येथील निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असुन मुंबईत नारायण राणे यांच्या जहु येथील निवासस्थानाबाहेर त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली असुन यावेळी शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे.
औरंगाबादमध्ये देखील नारायण राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा साठी आमदार आमदार अंबादास दानवे यांनी पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केले आहे.
नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी देखील नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे.

नेमकं असं घडलं काय?

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी महाड येथे राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

नेमके काय म्हणाले नारायण राणे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडून चुकुन स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवच्या ऐवजी हिरक महोत्सव हा शब्द आला परंतु तो लगेच दुरुस्त करून ताबडतोब पुन्हा अमृत महोत्सव शब्द वापरला परंतु या वर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय म्हणता ? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटले होते.
दरम्यान, चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.