व्यंकटरावच्या वीजनिर्मिती या वैज्ञानिक उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड.
आजरा.- प्रतिनिधी.
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) कोल्हापूर व विद्यानिकेतन आळते यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात “पिझो इलेक्ट्रिसिटी चा वापर करून चालणे /दाब देऊन वीज निर्मिती” हे उपकरण मांडले या उपकरणाला “द्वितीय क्रमांक” मिळाला. कु.आस्था सचिन गुरव व हाजिक मोहम्मद इरफान सय्यद या दोन विद्यार्थ्यांनी हे उपकरण बनवून सादर केले.
या पारितोषिक प्राप्त उपकरणाची नागपूर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी मा सुवर्णा सावंत ,शिक्षक नेते श्री दादासाहेब लाड, शिक्षण विस्तार अधिकारी पी.सी कुंभार या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षिका सौ. आशा सचिन गुरव यांना प्रशस्तीपत्र ,शिल्ड देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा चे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार, विज्ञान शिक्षक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या सुयशाबद्दल आजरा तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
