हातचलाखी करून वयस्कर महीलांना फसवणाऱ्या – आंतरराज्य टोळीतील दोन महीला व एक पुरुष यांना ताब्यात. ( मडिलगेतील – हौसा भाईंगडे या महिलेचे ) 2,66,000 /- रूपये किंमतीचे 24 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
आजरा.- प्रतिनिधी
हातचलाखी करून वयस्कर महीलांना फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन महीला व एक पुरुष यांना ताब्यात घेवून लुटलेले 2,66,000 /- रूपये किंमतीचे 24 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
दिनांक 26/12/2025 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास आजरा हायस्कुलजवळ यातील फिर्यादी हौसा शामराव भाईंगडे वय 65 वर्षे रा. मडीलगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांना अज्ञात एक पुरुष व महीलेने पुढे दंगा झाला असून पोलीसांची चेकींग चालु आहे, असे सांगून फिर्यादी यांच्या कानातील सोन्याची कर्ण फुले, दोन बुगड्या, गळ्यातील मणीमंगळसुत्र काढून रुमालात ठेवा, असे सांगून सोन्याचे दागिने रूमालात काढून घेवून रूमालाची गाठ मारून हातचलाखीने आरोपीनी दुसरा रूमाल यातील फिर्यादी यांचेकडे देवून फिर्यादी यांची फसवणूक केलेबाबत आजरा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.324/2025 भा.न्या. स. 2023 चे कलम 318(4), 3(5) प्रमाणे दिनांक 26/12/2025 रोजी 18.45 वा. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा हा दिवसा व आठवडी बाजारात गर्दीच्या ठिकाणी घडलेने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर कडील वेगवेगळी पथके तयार करून माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना पोलीस अंमलदार समीर कांबळे व राजु कोरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. ३२४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अज्ञात पुरुष व स्त्री आरोपी हे गुन्ह्यातील फसवणुक करून घेतलेले दागिने विकण्यासाठी उजळाईवाडी, ता. करवीर गावचे हद्दीतील भारती विद्यापीठकडुन पुणे बंगलोर हायवेस मिळणाऱ्या रोडचे कॉर्नरवर येणार आहेत. मिळाले माहिती अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथकाने आज दि. 31/12/2025 रोजी उजळाईवाडी, ता. करवीर गावचे हद्दीतील भारती विद्यापीठकडुन पुणे बंगलोर हायवेस मिळणाऱ्या रोडचे कॉर्नरवर सापळा लावून आरोपी नामे १) राकेश यंकाप्पा गोंधळी व.व. ३४, रा. तहसिलदार प्लॉट, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, २) दुर्गव्वा गंगाप्पा कंडले व.व.४५, रा. तहसिलदार प्लॉट, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, ३) मंजुळा राकेश गोंधळी व.व. २८, रा. तहसिलदार प्लॉट, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवून राकेश यंकाप्पा गोंधळी याचे कब्जातुन सोन्याची दोन कर्ण फुले, दोन बुगड्या, मणीमंगळसुत्र व मंजुळा राकेश गोंधळी हिचे कब्जातुन एक मंगळसुत्र, कानातील सोन्याच्या दोन बुगड्या, दोन सोन्याची फुले असा २४.५ ग्रॅम वजनाचा व २,६६,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे राकेश यंकाप्पा गोंधळी याच्याकडून जप्त केले दागिन्याबाबत आजरा पोलीस ठाणे गु.र.नं.३२४/२०२५ भा.न्या.स. कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे व मंजुळा राकेश गोंधळी हिचेकडून जप्त केले दागिन्याबाबत कोडोली पोलीस ठाणे गु.र.नं. २८/२०२४ भा.द.वि. स. कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद आहेत. आरोपी नामे १) राकेश यंकाप्पा गोंधळी २) दुर्गव्वा गंगाप्पा कंडले यांना आजरा पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह व आरोपी नामे ३) मंजुळा राकेश गोंधळी कोडोली पोलीस ठाणे येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, योगेश कुमार व अपर पोलीस अधीक्षक,.डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक, श्री. शेष मोरे, समीर कांबळे, राजू कोरे, योगेश गोसावी, सतिश जंगम, सतिश सुर्यवंशी, हिंदुराव केसरे, वैभव पाटील, संतोष बरगे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ, अमित मर्दाने, संजय हुंबे, प्रदीप पाटील, राजेंद्र वरंडेकर, मिनाक्षी पाटील यांनी केली आहे.
