ताराराणी आघाडीचा — प्रभाग ४ मध्ये दणदणीत शक्तीप्रदर्शन. शिट्टी पोहचली घरोघरी.
आजरा :- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराला दिसत आहे. सर्वच पॅनेलांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
त्याच अनुषंगाने ताराराणी आघाडीच्या तरुणी आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मध्ये गुरुवारी भव्य प्रचारफेरी, जनसंपर्क मोहीम आणि घरोघरी प्रचाराचा मोठा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रचारफेरीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी हे स्वतः सहभागी होऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या सोबत प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेवक पदाचे उमेदवार रशीद महंमद पठाण (चिन्ह – शिट्टी) यांनी देखील घराघरात जाऊन मतदानाची विनंती केली.
प्रभागातील रस्ते, वस्ती, चौक आणि महत्त्वाच्या भागांतून काढलेल्या या फेरीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी तसेच तरुण मतदारांनी उमेदवारांचे स्वागत करत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
मतदारांशी संवाद —विकासाचे आश्वासन व प्रभागातील समस्यांची नोंद
प्रचारफेरीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्त्यांची दुरुस्ती, कॅनल लाईन, स्ट्रीटलाइट, क्रीडासुविधा, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा, तसेच तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
तरुणी आघाडीच्यावतीने महिलांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

नागरिकांच्या अडचणी व सूचना यांची सविस्तर नोंद उमेदवारांनी केली असून निवडून आल्यास पहिल्या टप्प्यातच प्रभागाचा समग्र विकास हा मुख्य उद्देश राहील, असे मा. अशोक अण्णा चराटी यांनी सांगितले.
💥प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग.
या भव्य प्रचारफेरीत प्रभाग क्रमांक चारमधील तसेच संपूर्ण आजरा परिसरातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मुख्य कार्यकर्त्यांमध्ये
संतोष गोंधळी, मकसूद माणगावकर, सरफुद्दीन पठाण, मुजम्मिल लमतुरे, सिलेमान सोनेखान, सिलेमान भडगावकर, शाकीर भडगावकर, महेश डोणकर, अशोक निटुरकर, सरफुद्दीन सोनेखान, अल्ताफ तगारे, अश्रफ अली लमतुरे, विलास नाईक, विजयकुमार पाटील, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, संजय चव्हाण, अबुसहित माणगावकर, शरीफ खेडेकर, असलम खेडेकर, फजुला भडगावकर यांचा उत्साही सहभाग होता.
प्रचारफेरीचे नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व घराघरात पोचवलेला संदेश यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
🔶आज सायंकाळचे विशेष प्रचार नियोजन — प्रभाग सात
ताराराणी आघाडीचा प्रचार जोरात सुरू असताना आज सायंकाळी प्रभाग क्रमांक सात मध्येही महत्त्वाची प्रचारफेरी आयोजित करण्यात आली आहे.
या फेरीत नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. बालिका सचिन कांबळे या हरिजन वाडा, दत्त कॉलनी आणि तुळजाभवानी कॉलनी या ठिकाणी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
स्थानिक भागातील महिला, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून प्रभाग सातमधील प्रचार आणखी जोरदार होणार असल्याचे शहरात चर्चा आहे.

