Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात आंदोलनाला यश- संग्राम सावंत समन्वयक अखिल भारतीय किसान सभा

गिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात आंदोलनाला यश- संग्राम सावंत समन्वयक अखिल भारतीय किसान सभा

गिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात आंदोलनाला यश- संग्राम सावंत समन्वयक अखिल भारतीय किसान सभा

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गिजवणे येथे चालू असलेल्या आंदोलनाच्या ६ व्या दिवशी गिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधातील मागण्यांबाबत गटविकास अधिकारी यांच्या दालनात संघटनेबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी सर्व विभागांचे विस्तार अधिकारी व संघटनेच्या कॉ.संग्राम सावंत,ॲड.दशरथ दळवी, प्रभात साबळे, सागर शिंदे, जनार्दन तोडकर, गणेश कळेकर, सचिन लोहार, संतोष माने, मानतेश बन्ने व सह आंदोलक, कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराची सखोल चौकशी होण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. ग्रामपंचायत गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर येथील सन २०२०/२१ ते सन २०२३/२४ कालावधीतील कारभाराची सखोल चौकशीसाठी ग्रामपंचायत गिजवणे यांच्या कडून अहवाल मागविला आहे. उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने गिजवणे ग्रामपंचायतीला कळविणेत आले की, गिजवणे ग्रामपंचायतीने वरील दिलेल्या निवेदनात नमुद ग्रामपंचायत गिजवणेच्या कारभारा संदर्भातील संबंधित सर्व मुद्यांबाबत सविस्तर अहवाल या कार्यालयाकडे दि. ०१/१२/२०२५ पर्यंत सादर करणेत यावा.सदर निवेदनामधील पंचायत समितीशी संबंधित मुद्याबाबतची माहिती पंचायत समिती स्तरावर देणेत येत आहे.

तथापि ग्रामपंचायतीच्या संबंधित उर्वरीत सर्व मुद्याबाबतचा सविस्तर अहवाल या कार्यालयाकडे मुदतीत सादर करणेत यावा. अहवाल मुदतीत सादर न झालेस महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा शिस्त व अपिल) नियम १९६४ मधील नियम ४ चे तरतुदीनुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणेत येईल. याची गंभिर नोंद घ्यावी. असे पत्र शिजवणे ग्रामपंचीला देण्यात आले आहे.तसेच पंचायत समितीच्या पातळीवरील मुद्द्यांची चौकशी करून सविस्तर लेखी स्वरूपात माहिती, अहवाल व लेखी स्वरूपात संघटनेला देणार आहोत. असे लेखी पत्र संघटनेला दिली आहे. याबाबतीत गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन कार्यवाही व अंमलबजावणी करणार आहेत. गिजवणे ग्रामपंचायत इ संदर्भतील एक ते ६४ मागण्यांचे निवेदन नुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज व ग्रामपंचायत गिजवणे यांना दिलेले होते. विविध मागण्यांच्या संदर्भात प्रशासनाने गंभीरपूर्वक दखल घेऊन चौकशी करून सविस्तर अहवाल अखिल भारतीय किसान सभा या संघटनेला येत्या १५ दिवसात देणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लज पंचायत समिती, गडहिंग्लज कार्यालयासमोर गुरूवार दि.६ नोव्हेंबर २०२५ बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. आचारसंहितेत व जमाबंदीही अभिनव पद्धतीनं होणार गिजवणे ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात आंदोलन आचारसंहिता असताना संविधानिक मार्गाने हे बेमुदत ठिय्या आंदोलन गडहिंग्लज पंचायत समितीच्या आवारात केले जात होते.

आंदोलनाची पुढील दिशा ज्यावेळी ग्रामपंचायत गिजवणे खुलासा देईल आणि पंचायत समिती पातळीवरचे मुद्दे पंचायत समिती चौकशी करून अहवाल देईल.त्यानंतर पुढील लढ्याची दिशा संघटना ठरवणार आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या आंदोलनात
दळवी, सागर शिंदे गणेश कळेकर सचिन लोहार संतोष माने, जनार्दन तोडकर मानतेश बन्ने स्वप्नील कोरी बाबुराव कांबळे, विजय कडूकर आप्पासाहेब कडूकर अनिल सुतार, बंडा पाथवरट, विजय कातकर सहभागी होते
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.