आजरा साखरची वाहने स्वाभिमानी ने रोखली.- ऊसाची पहिली ऊचल ३७५१ रू जाहिर करावी.( कारखान्याच्या लेखी हमीपञाच्या आधारावर स्वाभिमानी ने आंदोलन केले स्थगीत.)
आजरा .- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफ आर पी १ कोटी ९५ लाख सन २०२२/२३ चा ५० रू चा थकीत हप्ता व चालु हंगामाचा ऊसाची पहिली ऊचल ३७५१ रू जाहिर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्याची वाहने अडवण्यात आली त्याचवेळी कारखान्याचे संचालक मंडळ टोलनाक्यावर जमा झाले झाले आणि संचालक व स्वाभिमानी चे पदाधिकारी यांची टोलनाक्यावर बैठक सुरू झाली.
स्वाभिमानी चे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यानी स्वागत करून आजरा कारखानेकडुन मागील हंगामातील थकीत एफ आर पी चा , सन २०२२/२३ चा थकीत ५० रू चा हप्ता आणि या वर्षी चा पहिला हप्ता जाहिर करावा. त्याशिवाय हंगाम सुरू करता येणार नाही हे स्पष्ट केले
राजेंद्र गड्ड्यानवार – राज्य सरकारच्या एक रकमी एफ आर पी चे तीन तुकडे करण्याच्या विरोधात मा. खास. राजु शेट्टी साहेब हे उच्च न्यायालयात जाऊन तो शासनाचा तीन तुकड्या चा जी आर रद्द करून पुर्वि च्या कायद्यानुसार एक रकमी एफ आर पी शेतकर्याना देणेचा निर्णय शेतकर्यांच्या बाजूने मिळवण्यात यशस्वी झाले त्यानुसार तुम्हाला ती रक्कम द्यावी. लागेल अन्यथा साखर जप्ती आणि संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करून घेणेची नामुष्की तुम्ही ओढवुन घेऊ नका असा थेट इशारा संचालकाना दिला.

यावर कारखान्याची बाजु मांडताना व्हा चेअरमन सुभाष देसाई यांनी स्वाभिमानी ची मागणी रास्त असुन थकीत एफ आर पी १ कोटी ९५ लाख १५ नोव्हेंबर पुर्वी देतो याबाबत चे लेखी पञ देतो व सन २०२२/२३ चा थकीत ५० चा हप्ता संचालक मंडळाच्या मिटिंग ला ठेवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतो. याबाबतचेही लेखी हमी आपण देत आहे. आणि चालु वर्षी च्या पहिल्या ऊचली संदर्भात लवकरच भुमीका जाहीर करू असे वचन देतो. वसंतराव धुरे यांनी ही कारखान्याची सकारात्मक भुमीका असल्याचे स्पष्ट केले.

कारखान्याच्या लेखी हमीपञाच्या आधारावर स्वाभिमानी ने आंदोलन स्थगीत केले यावेळी संघटनेकडून संजय देसाई, सखाराम केसरकर सुभाष पाटील, धनाजी पाटील, निवृत्ती कांबळे बसु मुत्नाळे दिपक पाटील सुरेश शिंगटे नरेंद्र कुलकर्णी काशीनाथ भादवणकर गंगाराम डेळेकर बबन बार्देस्कर पांडुरंग सावंत तर कारखान्याकडुन उदयराज पवार वसंतराव धुरे विष्णूपंत केसरकर, दिगंबर देसाई, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर,एम डी संभाजी सावंत, सह संचालक, आधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
