आजरा अर्बन बँकेच्या ना. म. जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव समारंभ सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ना.म. जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव समारंभ गुरुवार दि.०६/११/२०२५ रोजी सकाळी ११ वा. ११ मि. मा. नामदार हसन मुश्रीफ वैद्यकिय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाला आम. शिवाजीराव पाटील, चंदगड, गडहिंग्लज, आजरा विधानसभा महाराष्ट्र राज्य, मुंबई, आम. सुनिल शिंदे आमदार, वरळी विधान परिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अशोकअण्णा चराटी- चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख उपस्थितीत होते.

याप्रसंगी नाम. श्री. मुश्रीफ यांनी मुंबई येथील गिरणी कामगार व कामगार वर्ग हा सावकारी पाशातून जात होता. त्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी बँकेचे संस्थापक कै. आण्णा आणि कै. भाऊ यांनी ५० वर्षापूर्वी दि. २ एप्रिल १९७५ रोजी ना.म. जोशी मार्ग मुंबई या शाखेची स्थापना केली. बँकेने आपल्या भागातील लोकांना घर खरेदीसाठी कर्ज वितरीत केल्यामुळे बहूसंख्य लोकांची घरे झाली व लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचा बँकेचा उद्देश साध्य झाला असल्याचे मत व्यक्त करून आजरा बँकेने केलेल्या अलौकिक प्रगतीबद्दल अभिनंदन केले व आजरा बँकेने खाजगी व राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच प्रगती केली असलेचे गौरवउदगार काढले व समाधान व्यक्त केले. तसेच आम. श्री. पाटील व आम. श्री शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल गौरव उदगार काढून शुभेच्छा दिल्या.

अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागात स्थापन झालेली व शहरामध्ये शाखांचा विस्तार असणारी मल्टीस्टेट दर्जाची आजरा बैंक ही अग्रगण्य बैंक म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास पात्र झाली असलेचे सांगितले तसेच नॅशनल बँका ज्या सेवा सुविधा देत आहेत त्या सर्व आपल्या बँकेकडे उपलब्ध असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यानी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बैंकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code या सुविधांची माहिती दिली, तसेच आजच्या दिवशी शाखेमध्ये रु.५० लाखाच्या ठेवी जमा झाल्या.
उदघाटन प्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन संजय चव्हाण, संचालक श्रीमती अन्नपूर्णा चराटी, सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडेसो, रमेश कुरुणकर, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडकेसो, सौ. प्रणिता केसरकर मॅडम, श्रीमती शैला टोपले मॅडम, सौ. अस्मिता सबनिस मॅडम, सुनील मगदूम सुर्यकांत भोईटेसो, किरण पाटील, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरीसो, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीरसो तसेच शाखा मार्गदर्शक भैरु टक्केकर, गिरीधर कुराडे, कान्होबा माळवे व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकरसो व स्वागत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गंभीर यांनी केले. तर आभार व समारोप बँकेचे संचालक डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले.
