Homeकोंकण - ठाणेतिन - पाणी जुगार खेळताना आजऱ्यात - दहा जणांवर कारवाई.

तिन – पाणी जुगार खेळताना आजऱ्यात – दहा जणांवर कारवाई.

आजरा. प्रतिनिधी.१३.

आजरा येथील दर्गा गल्लीत एका घराचे बांधकाम चालू असलेल्या अडोश्यास तीन पाणी पत्त्यावर चढाओढीने पैसे लावत जुगार खेळत असताना दि. १२ रोजी रात्री उशिरा येथील दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुलजार मजीद लतिफ, झाकीर हुसेन लतीफ, कैस अब्दुलकलाम तकिलदार, मुश्राम इसुफ हकीम, निहाल अहमद आदम तकिलदार, मोसिम कादर तकिलदार, जावेद रसूल तकिललदार, तस्लीम उर्फ बबलू अमल तकिलदार, अब्दुल रजाक उर्फ आदु मोहम्मद माणगावकर, हर्षद कयुम बुड्डेखान, सर्व राहणार अमराई, दर्गा, वाणी गल्ली आजरा येथील असून पो. काँ. अनिल तराळ यांच्या फिर्यादीनुसार कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत एकूण मुद्देमाल ३७ हजार ९३० यामध्ये रोख रक्कम ६ हजार ९३० सह मोटरसायकल, मोबाईल हँडसेट, असा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. काँ ए. एस. शेळके करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.