आजरा साखर कारखान्याचा वार्षिक ताळेबंद बोगस.- शिवसेना शिंदे गट. आरोपांवर कारखाना व्यवस्थापन व संचालकांचे मौन ?
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा सहकारी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा दि २५ सप्टेंबर रोजी होती. त्याच दिवशी आजरा ( शिवसेना शिंदे ) गट पक्षाच्या वतीने ऊस उत्पादक आणि शेतकरी सभासदांसाठी काही महत्त्वाचे विषय समजावे यासाठी पत्रकार परिषदेत घेऊन शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, इंद्रजीत देसाई सह पदाधिकारी यांनी संचालक मंडळाने जनतेसमोर मांडलेल्या वार्षिक ताळेबंद अहवाल खोटा असून ऑडिटरला हाताशी धरून केलेली सभासदांची फसवणूक केली असल्याचे आरोप केले होते.
याबाबत अद्यापही कारखाना व्यवस्थापन व संचालक मंडळांनी मौन पाळले आहे. केलेल्या आरोपाबाबत प्रतीउत्तर न मिळाल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
मागील केलेल्या आरोपांमध्ये .-
ऑडिटरला हाताशी धरून केलेली सभासदांची फसवणूक आहे ताळेबंदामध्ये सन २०१७ १८/व १८ / १९ मधील १२ कोटी २४ लाख हे शेतकऱ्यांची देणे न दाखवता ती परस्पर भाग भांडवल व रिझर्व फंडाला परस्पर वर्ग करण्यात आली आहे.
फ्री व्हॅल्युशन सन २३/२४ मध्ये १५२ कोटीचा वाढ करण्यात आली आहे. व कायम मालमत्तेमध्ये ८६ कोटीची वाढ झालेली आहे.
४३ कोटी ३९ लाखाची वाढ झालेली आहे.
तसेच सन २३/२४ मध्ये प्री आपरेटीव्ह एक्सेशन ४ कोटी ८२ लाख ती वाढ एकुण ३३ कोटी ४ लाख ही खरी तर खर्चाच्या बाजुचे दाखवण्याची रक्कम घसारा पत्रामध्ये दाखवण्यात आली आहे. पण त्यावरती कुठल्याही प्रकारचा घसारा आकारण्यात आला नाही. हे सर्व पहाता कारखाना १ कोटी ४२ लाख नफ्यात ऐवजी चालू आर्थिक वर्षात नफ्यात नसून अंदाजे साडेतीन कोटी तोट्यात दिसतो.
तसेच वरील क्रमशः संचित तोटा १२० कोटी ऐवजी तो साडे तीनशे कोटी संचित अहवालातील रकमे नुसार जानवतो इतका कारखाना तोट्यात असुन सुद्धा संचालक मंडळ ३ लाख २३ हजाराचा बैठक भत्ता घेत आहे.
हे दुर्दैवी आहे. हा एकूण ताळेबंद नेटवर्क प्लस लावण्यासाठी खटाटोप असून कारखान्याच्या सद्य परिस्थितीशी विसंगत ताळेबंद आहे.
वरील आरोप शिंदे सेनेचे पदाधिकारी यांनी करत शुद्धिपत्रकाची मागणी केली होती. तीही मिळाली नसल्याचे समजते. केलेल्या आरोपामध्ये खरं कोण व खोटं कोण अशी सभासदांच्या मध्ये संभ्रम अवस्था आहे. तरी याबाबत कारखाना व्यवस्थापन व संचालक मंडळाकडून योग्य ती माहिती मिळावी. अशी मागणी काही सभासदाकडून होत आहे.
