संस्था सक्षम व्हायची असेल तर सभासदांचे हित जपले पाहिजे.- चेअरमन मुकुंददादा देसाई
{ उत्पादीत केलेला सर्व ऊस कारखान्याला घालावा. }
( आजरा साखर कारखान्यांची ३५ वी सर्वसाधारण सभा संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना या संस्थेची सन. २०२४/२५ वर्षाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ रोजी संपन्न झाली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना चेअरमन मुकुंदराव देसाई बोलत होते. स्वागत व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांनी केले. अहवाल वाचन संभाजी सावंत यांनी केले बोलताना चेअरमन श्री देसाई म्हणाले.
आजरा तालुक्यातील कार्यरत पाणी प्रकल्पामुळे ऊस क्षेत्रात निश्चितपणे वाढ होत आहे. परंतु गतवर्षी पाऊस पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे एकरी सरासरी ऊस उत्पादन घटत असल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून कारखान्याचे गळीताचे दिवस कमी होत आपल्या तालुक्यातील कार्यरत पाणी प्रकल्पामुळे ऊस क्षेत्रात निश्चीतच वाढ होत आहे. परंतु गतवर्षी पासून पावसाचे प्रमाण आहेत. सन २०२३-२४ चे हंगामाचे गळीताचे दिवस १११ मिळाले होते तर ऊस गाळप २,६४,००० मे. टन म्हणजेच सरासरी प्रतिदिनी २४०० मे.टन झाले होते. परंतु गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये गळीताचे दिवस कमी होऊन केवळ ९३ दिवसात २,७८,००० मे. टन म्हणजेच प्रतिदिनी सरासरी ३००० मे. टन गाळप झाले आहे. यावरून मशिनरी मध्ये केलेल्या सुधारणा सायलो सिस्टीम व एफएफई बॉडी खर्चात बचत होवून तो प्रति पोते रु. २.७० ने कमी झाला आहे. तथापी सरासरी एकरी उत्पन्न घटलेमुळे ऊसाची उपलब्धता कमी झाली उभारलेमुळे सरासरी प्रतिदिनी गाळप वाढले असून कारखान्याच्या बगॅस सेव्हिंगमध्ये दिड टक्के वाढ झालेली आहे. तसेच हमाली व त्याचा परिणाम म्हणून गळीताचे दिवस कमी होवून अपेक्षित गळीत झालेले नाही. तसेच अतिपावसामुळे ऊसातील साखरेवर परिणाम होवून साखर उताऱ्यात घट झालेचे दिसून येते.
कारखान्यावरील कर्जे व त्यावर दरमहा भरावे लागणारे व्याज पहाता केवळ ऊस गळीत करून त्या उत्पन्नातून कारखान्यास आर्थिक स्थैर्य मिळणार नाही, त्याकरीता कारखान्यास कमी व्याजाच्या व दीर्घ मुदतीच्या कर्जाची नितांत आवश्यकता आहे हे ओळखून कारखान्याच्या संचालक मंडळाने, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांचेकडे रु. १५२.२६ कोटी इतक्या रक्कमेचा कमी व्याजाचा व दिर्घ मुदतीचा कर्ज प्रस्ताव महाराष्ट्र शासनामार्फत सादर केला. सदर प्रस्तावाची छाननी होवून आपले कारखान्यास रु. १२२ कोटी ६८ लाख इतक्या कर्जास महाराष्ट्र शासनाने थकहमी दिली व कारखान्यास रु. १२२ कोटी ६८ लाख इतके ८.५ टक्के व्याज दराने कर्ज एनसीडीसी या वित्त संस्थेने मंजूर करून मार्च २०२५ मध्ये उचल दिली. या कामी महाराष्ट्र राज्य शासन मंत्री महोदयांचे सहकार्य लाभले. सदर कर्जाचे व्याजाचे शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे नियमित परफेक्ट कारखाना करीत आहे. असे कारखाना चेअरमन मुकुंदराव देसाई म्हणाले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला विद्यमान सर्व संचालक, आजी – माजी चेअरमन व्हा चेअरमन संचालक, कारखान्याचे सर्व अधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक मारुती घोरपडे यांनी मानले.
चौकट.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत.
माजी चेअरमन सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर, माजी संचालक तानाजी देसाई, तसेच कॉ संपत देसाई, शांताराम पाटील, युवराज पोवार, सुनील शिंदे, संजय देसाई, तुळसाप्पा पोवार, सह सभासदांनी संचालक मंडळाला प्रश्नांचा भडीमार करत सहभाग घेतला.
या विविध प्रश्नांमध्ये.
१) पेद्रेवाडी, गजरगाव येथील तीन हजार सभासद रद्द केले. रद्द केलेले सभासद – यांना साखर दिली नाही., सभासदाचा अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही. मग त्यांची सभासद रक्कम तुम्हाला वापरायचा अधिकार आहे. का? त्यांचे सभासद व कायम करा. किंवा त्यांची रक्कम देऊन टाका.
२) संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गावरील टोल बंद होण्यासाठी तालुक्यातील आमदार पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, यांनी टोल रद्द करू असे जाहीर केले. या आंदोलना त कारखानाच्या कामगारांनी सर्व नेतेमंडळी यांनी टोल विरोधी कृती समिती सोबत आंदोलन केले. परंतु टोल चालू होण्याची शक्यता आहे. तरी कारखान्यातील येणाऱ्या गाड्या यांची देखील टोल वसुली होणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा हातभार होण्यासाठी मंत्री महोदयांनी दिलेल्या शब्द पाळावा. व टोल रद्द व्हावा. असा ठराव करण्याची मागणी करण्यात आली.
३) पहिल्यांदा कारखाना नफ्यात आला आहे. याबाबत अभिनंदन चा ठराव पण कारखान्यावर असलेले कर्ज पुढील ८५ वर्ष फिटणार नाही हे घेत खेदजनक.. याबाबत काय करायचे.
४) गरज नसताना केरळ खर्च, कर्जमाफी करावी ठराव
५) सरसकट सभासदांना साखर द्यावी. यामध्ये सभासद रकमेनुसार प्रति किलो द्यावी पण. ठराविकच रक्कम असणाऱ्या सभासदांना साखर देणे हे चुकीचे. मुझे पायाची सभासद त्यांना साखर दिली जात नाही.
६) साखर कारखान्याचे पायाभूत सभासद यांच्या तीन हजार रुपये रकमेचे आज व्याजाने तीस हजार रुपये मग शेअर्स रक्कम पूर्ण करण्यासाठी आपण आव्हान करत आहात इतके दिवस वापरलेल्या पैशाचे व्याज सभासदांना देणार का.?
७) आजरा तालुक्यातील झालेले प्रकल्प येथे लाभ क्षेत्रात न येणारे क्षेत्र ७६ टक्के वंचित आहे. या वंचित शेतकऱ्यांना शेताला पाणी दिल्यास ऊस क्षेत्रामध्ये वाढ होईल. याबाबत अशा शेतकऱ्यांना लाभ क्षेत्रात घेऊन शेताला पाणी मिळावे. याबाबतचा ठराव घालण्याची मागणी केली
अशा विविध प्रश्नांची वार्षिक सर्वसाधारण सभेत विचार न झाली.
