आजरा. प्रतिनिधी.१२
आजरा येथील महसूल विभागाच्या वतीने राबवत असलेली ऑनलाइन पीक पाणी योजना मोहिमेला आजरा तालुक्यात सुरुवात झाली असून शासनाची नव्याने उदयास येत असलेली खातेदाराने स्वतः पीक पाणी नोंद करणारी ही योजना ( मोहिम ) असून याबाबतची माहिती मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी गावोगावी जाऊन देत आहेत. खातेदार शेतकरी यांना आपले पीक पाणी ऑनलाईन कसे लावावे याबाबतचा शासनाने दिलेल्या लिंकवरुन पीक- पाणी लावण्याची माहिती आजरा तालुक्यात आज दि. १२ रोजी काही गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेला खातेदार किती सक्रिय सहभाग घेऊन आपले पीक पाणी स्वतः कसे नोंद करतात याबाबतचा आढावा सदर लिंक मधून परीपुर्ण यशस्वी झाल्यानंतर यानंतर अधिकृत शासन अमलात आणणार असल्याचे समजते.
मडिलगे तालुका आजरा येथे मंडळ अधिकारी जी. बी. पाटील, तलाठी विद्या सूर्यवंशी, कोतवाल दयानंद कांबळे, सरपंच गणपतराव आरळगुडंकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत खातेदार शेतकरी यांना शासनाने दिलेल्या लिंक वरून आपण सर्व माहिती भरून आपले पिक- पाणी कसे नोंद करावे. याबाबतची माहिती तलाठी सौ. सूर्यवंशी यांनी दिली. या मोहिमेला शेतकरी खातेदारांचा यांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी ग्रामसेविका कविता जाधव , के. व्ही येसणे, दीपक देसाई, तसेच खातेदार गणपती पाटील, धोंडीबा घाटगे, धोंडीबा जाधव, बाबू घाटगे, भाऊ हासबे, गणपती येसने, आप्पा घंटे, संदीप पाटील, दुलबा जाधव, रामचंद्र दिवेकर, रामा कातकर, लक्ष्मण कातकर, राजेंद्र इंगळे, भिवा गुरव, आनंद घाटगे, विजय कातकर सह १०० हुन अधिक खातेदार महिला खातेदार उपस्थित होते.
【 नव्याने अमलात आलेला लिंक ॲप मधून खातेदार यांनी स्वतः पीक पाणी नोंद करण्याची मोहीम यामध्ये काही काळ खातेदार संभ्रमावस्थेत पडले होते. खातेदार यांनी तलाठी यांना आमच्याकडे स्मार्ट मोबाईल नाहीत. आम्ही आमची पिक -पाणी कशी नोंद करायची अशी विचारणा करत होते. परंतु हा ॲप सर्वांना आपले पीक पाणी नोंद करण्याचे शिकण्यासाठी आहे. सर्वांना याबाबतची माहिती बदलत्या युगामध्ये असावी व स्वतः आपण शिकावे व आपल्या सात – बारा पत्रकी पीक पाणी स्वतः लावावे असे शासनाचे धोरण आहे. असे तलाठी सौ. सूर्यवंशी यांनी खातेदार शेतकरी यांना सांगितले.】
【 सदर लिंक वरून ऑनलाइन पीक पाणी लावत असताना सर्व माहिती भरल्यानंतर ओ.टी.बी येत नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. तालुक्यातील काही ठिकाणी सर्व्हर ( नेट ) मुळे ओ. टी. बी येत नसला तरी ऑनलाईन सात- बारा पत्रकी नोंद करण्यात असलेली मोहीम ओ.टी.बी आल्यानंतरच खऱ्या अर्थाने सात- बारा पत्रकी मध्ये पीक- पाणी नोंद घालता येते परंतु शासन धोरण जरी चांगले असले तरी ग्रामीण भागात सर्व्हर नसल्यामुळे हि मोहीम कितपत यशस्वी होते हे पाहावे लागेल.】
