आजरा. प्रतिनिधी. १०.
आजरा येथील शिवसेनेच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे काढावी याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे. आजरा – गडहिंग्लज रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे चार – चाकी व दोन चाकी वहाने चालवताना अडचण निर्माण होत आहे. वहान चालवत असताना व वहान रस्त्याच्या खाली घेत असताना रस्ता खुदाई केल्यामुळे, खुदाई केलेल्या ठिकाणी गाडी जमिनीत रुतत आहे. यामध्ये काही मोबाइल कंपनी मालकांनी रस्त्याच्या बाजूला खुदाई केली व खुदाई केलेली मुजवत असताना यावर मातीचे थर टाकून दिखावा काम केले आहे. सदर वाहन खुदाई केलेल्या व माती टाकलेल्या ठिकाणी गेल्यास वाहने जमिनीत रुतत आहेत. तसेच रस्त्यावर खड्डे आहेत अशा वेगवेगळ्या कारणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता सदर रस्ता आमच्या अखत्यारित येत नाही असे सांगितले जाते. यासाठी संबंधित अधिकारी व नॅशनल हायवे चे अधिकारी यांना समक्ष बोलवून दि. २० रोजी तहसील कार्यालयात येथे बैठक व्हावी. व या रस्त्याची यापुढील जबाबदारी नेमकी कोणाची आहे. रस्त्याची डागडुजी कोण करणार याबाबत चौकशी व्हावी अशी विनंती आजरा शिवसेना यांनी तहसीलदार यांना केली आहे. या निवेदनावर शिवसेना ता. प्रमुख राजेंद्र सावंत, उप. ता. प्रमुख संजय पाटील, युवासेना सुधीर सुपल, दयानंद निऊगरे, जितेंद्र नांदवडेकर ,अमर डोंगरे, दिलीप बोलके, अश्विनी राणे विजय कोंडुसकर, अक्षय कांबळे सह शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.
