🟣आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन पूर्ण करा.- आंबेज़ोहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव
🟣श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर – संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच – आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल.
🟣मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.
🟣तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश.
🟣आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन पूर्ण करा.- आंबेज़ोहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव
आजरा.- प्रतिनिधी.

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन पूर्ण करण्यासाठी आंबेज़ोहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव त्यांचे नेतृत्वाखाली आजऱ्यातील तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
१) ज्यांना पुनर्वसनामध्ये जमिनी मिळाल्या त्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर चुकीचा बोजा चढवाला आहे ती कमी करण्यात यावा
२) कडगाव येथील पुनर्वसन वसाहतीमध्ये 18 नागरी सुविधा देण्यात याव्यात.
३) कड़गांव वसाहतीमध्ये डांबरीकरण करण्यात यावे लाईट व पाण्याची सोय करावी.
४) कड़गांव येथील काही भूखंड सकल भागात आहेत त्यांना भराव टाकून सपाटीकरण करून देण्यात यावे.
५) वसाहतीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या वेगवेगळ्या इमारतीचे खिडक्या, दरवाजे बसवण्यात यावेत.
६) पूर्वीप्रमाणे दर बुधवारी किंवा पंधरा दिवसातून एकदा पुनर्वसनाची बैठक प्रांत कार्यालयात घेण्यात यावी व प्रगती आढावा घेण्यात यावा.
७) करार झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे व्याजासह देण्यात यावीत.
८) थोडे पैसे व थोडी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना धरणग्रस्तांना भूखंड देण्यात यावेत.
९) अद्याप पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची व अर्थ पुनर्वसन झालेल्या शेतक-यांची यादी मिळावी.
१०) ज्यांना ज्यांना भूखंड मिळाले अशा दोन्ही वसाहती मधील धरणग्रस्तांची यादी मिळावी.
११) प्रांत कार्यालयातून पुनर्वसन होण्यास वेळ लागत असल्याने जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडे कार्यभार सोपवण्यात यावे व गडहिंग्लज येथील कामकाज बंद करावे
खरे तर पुनर्वसन करण्यासाठी पुरेशी जमीन लाभक्षेत्रात असल्याची खात्री केल्याशिवाय धरणाचे काम चालू केले जात नाही व महाराष्ट्रातील पुनर्वसन कायद्यामध्ये स्पष्ट आहे आधी पुनर्वसन मग धरण मात्र झाले उलटेच. धरणात पाणीसाठा झाला तरी पुनर्वसन झालेले नाही. आता तरी पुनर्वसन करावे. धरणग्रस्तांना दोन ठिकाणी वसाहती करून भूखंड वाटप केले आहेत सुरुवातीला आम्ही काही धरणग्रस्त शेतकऱ्याऱ्यांनी लिंगनूर येथील भूखंड मिळावेत म्हणून कडगांव येथील भूखंड नाकारण्यात आले होते मात्र शासकीय यंत्रणा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने नाविलाजाने आम्ही १४ धरणग्रस्त शेतकऱ्यांनी कडगांव येथील भूखंड स्वीकारले आहेत. मात्र कड़गाव येथील वसाहतीमध्ये १८ नागरी सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. लिंगनूर येथे भूखंडाचा ताबा देण्यापूर्वी अंतर्गत डांबरीकरण पूर्ण झाले होते. मात्र कड़गांव वसाहतीमध्ये डांबरीकरण झालेले नाही तसेच काही भूखंड सखल भागात आहेत त्या ठिकाणी भराव टाकून लेवल करून देणे गरजेचे आहे.
लाईट, पाणी, मंदिर जागा, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मैदान, शौचालयाची दारे, खिडक्या, बांधण्यात आलेल्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या चोरीस गेले आहेत असे समजते त्याबाबत चौकशी व्हावी. प्रत्येक बुधवारी पुनर्वसनाबाबत आढावा बैठका घेतल्या जात होत्या. त्या पूर्णपणे बंद आहेत पुनर्वसनाच्या बैठका घेऊन पुनर्वसन पूर्ण करावे. बऱ्याच लोकांचे अर्ध पुनर्वसन झाले आहे त्यांचे पुनर्वसन पूर्ण करावे. करार झालेल्या काही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांना त्यांचे पैसे देण्यात यावेत. थोडे पैसे व थोडी जमीन घेण्याची त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने विनंती मान्य केलेल्या शेतकऱ्यांना भूखंड देण्यात यावेत. अद्याप पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची यादी मिळावी. ज्यांचे अर्ध पुनर्वसन झाले आहे त्यांचीही यादी मिळावी. दोन्ही वसाहतीमध्ये भूखंड वाटप झालेल्या शेतकऱ्यांची यादी मिळावी. पुनर्वसन सुलभ होऊन शेतकऱ्यांचे हेलपाटे कमी व्हावेत या हेतूने प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथे पुनर्वसनाचे काम चालू केले मात्र झाले उलटेच. सदर आपले कार्यालय फक्त पोस्टमनाचे काम करत असून आलेला अर्ज कोल्हापूरकडे पाठवला जातो त्यामुळे इतर धरणातील पुनर्वसन लवकर झाले आहे मात्र आंबेओहोळचे पुनर्वसन पंचवीस वर्षे झाले तरी 40% पुनर्वसन बाकी आहे. संघटनेसोबत सकारात्मक भूमिकेतून पाहिल्यास प्रश्न सोडवणे सोपे होईल याकरिता पंधरा दिवसातून एकदा बुधवारी बैठक घेण्यात यावी ज्यांना पुनर्वसनामध्ये जमिनी मिळाल्या त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीचा बोजा चढवला तो कमी करण्यात यावा. निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी पांडुरंग शिंदे, सदाशिव निम्मे, रोहिणी चौगुले, सखाराम कदम, आनंद पावले सह आंदोलन उपस्थित होते.
🟣श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर – संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच – आयोजित वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात संकेत पाटील तर शालेय गटात पृथ्वीराज चव्हाण, समृध्दी वांद्रे प्रथम.
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे कै. पांडुरंग बिडकर गुरूजी स्मृती खुल्या वक्तृत्व स्पर्धेत संकेत कृष्णात पाटील पाडळी ता. करवीर यांनी प्रथम क्रमांक मिळवीला, तर कै. लक्ष्मण पाटील गुरूजी स्मृती प्राथमिक शालेय वक्तृत्व स्पर्धत कु. पृथ्वीराज सर्जेराव चव्हाण – कुमार विद्यामंदिर सरंबळवाडी व कै. रमेश टोपले स्मृती माध्यमिक शालेय वक्तृत्व स्पर्धेत कु. समृध्दी उत्तम वांद्रे – पेरणोली हायस्कुल पेरणोली यांनी प्रथम कमांक पटकाविला.
खुल्या वक्तृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक चैतन्य कुंडलिक कांबळे कोळवण ता. भुदरगड, तृतीय क्रमांक कु. अमृता पांडुरंग सागर शिप्पूर ता. गडहिंग्लज, चतुर्थ क्रमांक चारूदत्त महादेव माळी -अब्दुललाट ता. शिरोळ व पाचवा क्रमांक कु. श्रृती विष्णू कांबळे मडिलगे, ता. आजरा यांना मिळाला. शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात व्दितीय क्रमांक कु. रिया संतोष पारपोलकर आजरा हायस्कुल आजरा, तृतीय क्रमांक कु. सानिया सिकंदर शिदलाळे आजरा हायस्कुल आजरा तर कु. शिवराज बाजीराव देसाई – विद्यामंदिर कोरीवडे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. माध्यमिक गटात व्दितीय क्रमांक कु. हाजिक इरफान सय्यद – व्यंकटराव हायस्कुल आजरा, तृतीय क्रमांक कु. सानवी लक्ष्मण चौगुले -व्यंकटराव हायस्कुल आजरा तर कु. युविका अमर पोवार पं. दीनदयाळ विद्यालय आजरा यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या स्पर्धामध्ये ६५ स्पर्धकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, कै. पांडुरंग बिडकर, कै. लक्ष्मण पाटील व कै. रमेश टोपले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने स्पर्धेची सूरवात झाली. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते. देशभक्त रत्लाप्पाना कुंभार सहकारी सूतगिरणी चे कार्यकारी संचालक संजय बिडकर, इंजिनिअर विजयकुमार पाटील, इंजिनिअर निनाद टोपले व चंद्रशेखर बटकडली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. खुल्या गटासाठी डॉ. मारूती डेळेकर, विजय पोतदार, शुभांगी निर्मळे तर शालेय गटासाठी बी. एम. कामत, किशोर चव्हाण, तानाजी पावले, भारती चव्हाण व शशिकांत पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या कार्यक्रमाला सौ. सुनिता बिडकर, विनय बिडकर, राजेश टोपले, संतोषी टोपले, इराण्णा पाटील, आप्पा पावले वाचनालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक संभाजीराव इंजल, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, गिता पोतदार, सुचेता गडडी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, गीता तेजम, ज्योती कुंभार, बाबूराव पाटील, संदिप देसाई, वृषाली केळकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार, आजरा हायस्कुल व पं. दीनदयाळ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, कार्यवाह कुंडलिक नावलकर व विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन केले तर उपाध्यक्षा विद्या हरेर पाटील यांनी आभार मानले.
🟣मृत्युंजय’कार शिवाजी सावंत स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न.
आजरा .- प्रतिनिधी.
आजरा नगरीचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन आजरा येथे शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत, डॉ. शिवशंकर उपासे व चंद्रशेखर बटकडली यांनी यावेळी आपल्या मनोगतातून शिवाजी सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी नगराध्यक्षा ज्योत्स्ना पाटील चराटी, डॉ. शिवशंकर उपासे, इंजिनीअर विजयकुमार पाटील, पत्रकार ज्योतीप्रसाद सावंत, सुनिल पाटील, चंद्रशेखर बटकडली, आप्पा पावले, संभाजीराव सावंत, शैला टोपले, वाचन मंदिराच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडिलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, गीता पोतदार, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, राजेंद्र सावंत, गौरव देशपांडे, संयोगिता सुतार, प्रेमा साठे, शुभांगी चोडणकर, निखील कळेकर, महादेव पाटील, महादेव पोवार यासह स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
शिवाजी सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथालयाच्यावतीने दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी शालेय व खुल्या गटाच्या वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन कारण्यात आले. या स्पर्धाना विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच दिनांक १६ ते १८ सप्टेंबर पर्यंत वाचनालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित कारण्यात आले. या प्रदर्शनास आजरा शहरातील व तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथालयाच्या वाचकांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.
🟣तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश.
आजरा.- प्रतिनिधी


श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांचेमार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय वर्तृत्व स्पर्धेत आजरा हायस्कूल आजराचे सुयश. लहान गह- तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये बहान गटातून कु. रिया संतोष पारपोलकर – द्वितीय क्रमांक व कु. सानिया सिकंदर सिदलाळे – तृतीय क्रमांक पटकाविला. व मोठग गह – तालुकास्तरीय वकर्तृत्व स्पर्धेमध्ये कुः धनश्री सुभाष लाड व कु. शिफा मुबारक भडगावकर यांना सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. या सर्व विदद्यार्थिनीना सी. व्ही. एन्च अडकूरकर स्पर्धा विभागप्रमुख, व एस. आर. कांबळे मॅडम यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेः या यशस्वी विदयार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापक सो. एच. एस कामत, पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन मिळाले.
