🛑सावधान! – बनावट ‘आयकर अधिकारी’ दाखवून लाखोंची लूट
🟣स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना- शिवसैनिकाकडून पुतळ्याची स्वच्छता.
🛑सावधान! – बनावट ‘आयकर अधिकारी’ दाखवून लाखोंची लूट
सांगली – प्रतिनिधी
घटना.- सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे सोमवारी रात्री सुमारे 11 वाजता ही धक्कादायक घटना घडली.
👉कसा प्रकार झाला.
तीन अज्ञात महिला-पुरुष घरात आले. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगून बनावट वॉरंट दाखवत त्यांनी घराची झडती सुरू केली. डॉक्टर ज. द. म्हेत्रे यांचे संपूर्ण कुटुंब घरात असताना त्यांनी दहशत निर्माण केली.
👉लूट
सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू मिळून कोट्यवधी रुपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवले.
🔴पोलिस कारवाई
प्रकरण उघड झाल्यानंतर तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.
🟥सतर्कता उपाय :
कोणत्याही अधिकाऱ्यांच्या नावाने घरात येणाऱ्यांकडून नेहमी ओळखपत्राची खात्री करा.
♦️वॉरंट दाखवले तरी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क करून तपासणीची पुष्टी करून घ्या.
♦️घरात CCTV व इतर सुरक्षा उपाय ठेवा.
♦️संशयास्पद हालचाली ताबडतोब पोलिसांना कळवा.
🟣स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना- शिवसैनिकाकडून पुतळ्याची स्वच्छता.
मुंबई.- प्रतिनिधी.


मुंबई दादर येथे असलेला स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पत्नी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची कोणी अज्ञात इसमाने लाल रंग मारून विटंबना केली असल्याचे उघडकीस दिसले आहे. या माँसाहेब पुतळ्याची स्वच्छता केली आहे.
या ठिकाणी शिवसेना नेते अनिल देसाई,येथील शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख तसेच दिवाकर रावते घटनास्थळी पोचून पाहणी केली आहे. थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार याची माहिती समजते.राज्यात ठिक ठिकाणी शिवसैनिकांचे आंदोलन
