Homeकोंकण - ठाणेमुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात;बाप्पावर फुलांची-गुलालाची उधळण ( लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला...

मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात;बाप्पावर फुलांची-गुलालाची उधळण ( लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात होणार सुरूवात.)

🟥मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात;
बाप्पावर फुलांची-गुलालाची उधळण ( लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात होणार सुरूवात.)

मुंबई :- प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईत मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली असून थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात होणार आहे.

🔴मुंबईच्या राजाचा पहिला मान असतो. विसर्जनादिवशी गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा जोपर्यंत मार्गस्थ होत नाही, तोपर्यंत मुंबईत कोणत्याही गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघत नाही. सकाळी ८ वाजता या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं ही विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईतील हजारो सार्वजनिक मंडळांचे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन आज या ठिकाणी केले जाणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी मुंबई पोलीस आणि महानगरपालिका सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

🟥यंदा गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून प्रथमच एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यंदा 6500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि दीड लाख घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार पोलीस कर्मचारी आणि 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. तसेच, वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत गणपती विसर्जनाची धामधूम सुरु असताना दुसरीकडे या सोहळ्याला वरुणराजानेही हजेरी लावली आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज जोरदार पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.