Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदेशात वस्त्रोद्योगात मंदीचे सावट तरीही आजरा - सूतगिरण सुरळीत चालू.- अशोक चराटी(...

देशात वस्त्रोद्योगात मंदीचे सावट तरीही आजरा – सूतगिरण सुरळीत चालू.- अशोक चराटी( पुढील वर्षात सभासदांना डेविडंट देण्याचा मानस🟣कोळींद्रे येथील महालक्ष्मी यात्रेबाबत प्रश्नचिन्ह…ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा.- कोळींद्रे ग्रामस्थांची पत्रकार बैठक

🛑देशात वस्त्रोद्योगात मंदीचे सावट तरीही आजरा – सूतगिरण सुरळीत चालू.- अशोक चराटी
( पुढील वर्षात सभासदांना डेविडंट देण्याचा मानस
🟣कोळींद्रे येथील महालक्ष्मी यात्रेबाबत प्रश्नचिन्ह…ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा.- कोळींद्रे ग्रामस्थांची पत्रकार बैठक

🛑देशात वस्त्रोद्योगात मंदीचे सावट तरीही आजरा – सूतगिरण सुरळीत चालू.- अशोक चराटी
( पुढील वर्षात सभासदांना डेविडंट देण्याचा मानस. आजरा सूतगिरणीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न. )

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

वस्त्रोद्योगात मंदीचे वातावरण अजूनही आहे. गेली दोन तीन वर्षे बाजारपेठेतील अस्थिर परिस्थिती आहे, त्यामुळे बऱ्याच खाजगी तसेच सहकारी सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. अनेक सूतगिरण्या भाडेतत्वावर चालविण्यास दिल्या आहेत. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आमच्या सूतगिरणीने संपूर्ण मशिनरी ओव्हर ऑयलींग व आधुनिकीकरण करून घेतले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून सूतगिरणी चांगल्या पध्दतीने सूरू ठेवली आहे. यामध्ये फक्त कर्जाचा बोजा अधिक असल्यामुळे काटकसरीने कारभार चालू आहे. यामुळे डेव्हिडंट देता येत नाही पुढच्या वर्षी नक्कीच डेव्हिडंट देता येईल. असं धोरणाने सूतगिरणीची अतिरिक्त जागा विक्री केल्यास सूतगिरण कर्ज मुक्त होईल. यापुढील कारभार सुरळीत चालेल. असे अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी बोलताना म्हणाले.

यावेळी चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी म्हणाल्या. आपल्या सूतगिरणीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते. या भागाचा विकास व येथील जनतेच्या आर्थिक प्रगती करण्याच्या हेतूने, कै. आण्णा व भाऊ यांच्या संकल्पनेतून या आपल्या सूतगिरणीची स्थापना झाली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने उभ्या राहिलेल्या या सूतगिरणीची सुरूवातीपासूनच योग्य नियोजनपूर्वक वाटचाल सुरू आहे. सूतगिरणीला राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. या सर्व यशाबद्दल, जनरल मॅनेजर व सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते. आपणा सर्वांचे पाठबळ, संचालकांचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न या सांघिक बळावरच सूतगिरणीची यशस्वी वाटचाल सूरू आहे. सूतगिरणीने गारमेंट विभाग सुरू करून येथील १०० महिलांनाही काम दिले आहे व कै. आण्णा व भाऊ यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

बाजारपेठ असती असताना अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आमच्या सूतगिरणीने संपूर्ण मशिनरी ओव्हर ऑयलींग व आधुनिकीकरण करून घेतले आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होवून सूतगिरणी चांगल्या पध्दतीने सूरू ठेवली आहे. तसेच २५ हजार चात्यांचा सूतगिरणीचा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेकडून ५ कोटी कर्ज मंजूर करून घेतले आहे. त्यातुन उर्वरीत नविन मशिनरी येत्या दोन ते तीन महिण्यामध्ये बसवून प्रकल्प पूर्ण होणार आहे. मशिनरी मध्ये वाढ झाल्यामुळे सूताचे उत्पादनात वाढ होवून तोटा कमी होणार आहे. त्यामुळे सूतगिरणी नफ्यात येईल यामध्ये कांही शंका नाही. आतापर्यंत अडचणीच्या परिस्थितीत, आपल्या सर्वांकडून आजपर्यंत सहकार्य मिळाले, तसेच बहूमोल सहकार्य पुढील काळातही मिळावे व कै. आण्णा भाऊंच्या स्वप्नातील हा प्रकल्प आणखी यशस्वी करण्यासाठी आपण मला व माझ्या सहकार्यांना शुभेच्छा दयाव्यात असे बोलताना श्रीमंती चराटी म्हणाल्या.

oplus_131074


सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे म्हणाले सद्यस्थितीतील सूतगिरणीची व राज्यातील देशातील सूतगिरणी कशा पद्धतीने चालत आहेत. ती तोटा सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीत सूतगिरणी चालू ठेवली आहे. सूतगिरणी वर असलेले कर्ज. सूतगिरणीची अतिरिक्त जागा विक्री करून बोजा नसलेली सूतगिरण अशी चालवायची आहे. सध्याचे कर्जाचे व्याज कर्जाचा हप्ता, कामगार पगार व वीज बिल दीड कोटी रुपये होते. यामध्ये वस्त्रोद्योगाला शासनाचा अल्प प्रतिसाद आहे. यामुळे राज्यातील अनेक सूतगिरणी बंद आहेत. व अतिरिक्त जमीन विक्री करून सूतगिरण कर्जमुक्त झाल्यास पुढच्या वर्षी सभासदांना डेविडं देता येईल असे व्हा. चेअरमन श्री देशपांडे म्हणाले.

Oplus_131074

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष व आजरा सूतगिरणीचे संचालक अनिकेत चराटी यांनी मनोगत व्यक्त करत सूतगिरणीच्या कामकाजाचा आढावा, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अभिनंदन केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला संचालक अविनाश सोनटक्के, कृष्णांत गिरीगोसावी, जयसिंग देसाई, रजनीकांत नाईक, नारायण मुरुकटे, इंजि.‌जी.एम.पाटील, राजाराम पोतनीस, इंजि.सुधीर कुंभार, डॉ. इंद्रजीत देसाई, डॉ. संदिप देशपांडे, श्रीमती मालूताई शेवाळे, सौ. मनिषा कुरुणकर, हसन शेख सह अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन सटाले यांनी केले आभार संचालक शशिकांत सावंत यांनी मानले.

🛑यात्रेसाठी अवधी द्या…
२०२७ लाच यात्रा घ्यावी : पत्रकार बैठकीत मागणी
( कोळींद्रे येथील महालक्ष्मी यात्रेबाबत प्रश्नचिन्ह…ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा.- कोळींद्रे ग्रामस्थांची पत्रकार बैठक )

आजरा : – प्रतिनिधी.

कोळींद्रे गावातील कांही मूलभूत प्रश्न कायम आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सदर प्रश्न मार्गी लावण्याची संधी ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहे‌. यंदा असणारा ओला दुष्काळ, गावामध्ये गटर्स,घरे, रस्ते, पथदिवे यांची प्रलंबित असणारी कामे या पार्श्वभूमीवर काही मंडळींनी जाहीर केलेल्या महालक्ष्मी यात्रेला आपला विरोध नसून सर्वसामान्यांना तयारीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा अशी रास्त मागणी असल्याने घाईगडबडीने यात्रा करण्यापेक्षा ती २०२७ मध्ये करून ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा अशी भूमिका आज कोळींद्रे येथे पार पडलेल्या ग्रामस्थांच्या पत्रकार बैठकीत मांडण्यात आली.

मुंबईकर ग्रामस्थांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही मंडळींनी गडबडीने महालक्ष्मी यात्रेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.तो जाहीर करत असताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची गरज होती. गावातील अनेकांनी आपली घरांची कामे काढलेली आहेत, विवाह समारंभा सारखे समारंभ प्रलंबित आहेत असे असताना यात्रा जाहीर करणे निश्चितच चुकीचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन यात्रा पार पडल्यास निश्चितच ते कौतुकास्पद होईल. परंतु तसे न होता घाई गडबडीने यात्रा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला केवळ १८ लोक हजर होते. १८ लोक म्हणजे गाव काय ? असा सवालही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मुळातच यात्रेला यावर्षी विरोध असल्याने वर्गणी गोळा करण्यावरही मोठ्या मर्यादा येणार आहेत. जुलैमध्ये यात्रा जाहीर करून ती मे महिन्यात घेणे केवळ अशक्य आहे.

ग्रामस्थांना तयारीसाठी किमान दीड ते दोन वर्षाचा कालावधी मिळणे आवश्यक आहे असे असताना शड्डू मारून यात्रा करण्याचा अट्टाहास कशासाठी ? असा सवालही करण्यात आला आहे. सात सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रमुख मंडळींची बैठक मुंबईस्थित ग्रामस्थांनी आयोजित केली आहे या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा असून त्यातूनही मे २०२६ मध्ये यात्रा घेण्याचा निर्णय झालाच तर या यात्रेला कोणत्याही प्रकारची वर्गणी न देता आम्ही २०२७ च्या यात्रेकरिता बळ सोडू असा इशाराही उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने सुरेश बुगडे व संभाजी सावंत यांनी भूमिका मांडली.

बैठकीस शंकरराव उगाडे, महादेव पाटील, लक्ष्मण परीट, सुरेश करडे,गोविंद नारळकर, जयराम संकपाळ, तानाजी बुगडे, बाबू जाधव, विजय कांबळे, भिकाजी गोंधळी, रामचंद्र पाटील,प्रशांत जाधव, तानाजी जाधव, रुपेश भोगले, शिवाजी उंडगे, मारुती उगाडे, प्रा. तानाजी राजाराम, संदीप उगाडे, शिवाजी न्हावी, मारुती भोगले, लिंगाप्पा करडे, संतराम कुराडे, मारुती चव्हाण, सागर पाटील, शिवाजी सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.