Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा संपन्न..

गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा संपन्न..

गोकुळ दूध संघाच्या अडीअडचणी – दूध संलग्न वाढीविषयी आजऱ्यात मार्गदर्शन मेळावा संपन्न..

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न असणाऱ्या आजरा तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ, सदस्य व सचिव यांची संपर्क सभा शनिवार दि. २३/८/ २०२५ रोजी दुपारी १ वा. अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल आजरा हायस्कूल आजरा येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते . स्वागत व प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केले.
याप्रसंगी बोलताना चेअरमन श्री मुश्रीफ म्हणाले. महाराष्ट्रातील नावारूपाला आलेला गोकुळ दूध संघ हा दुध उत्पादक शेतकरी यांच्या मुळे नावा रूपाला आला आहे. म्हैशीच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. नवनवीन योजना संघ मंडळ घेऊन येतो आहोत. यामध्ये गडहिंग्लज येथे गोठा करणार आहोत. ११ ते १२ लिटर दूध संकलन करणाऱ्या दुध उत्पादक यांना अर्थात क्षमतेनुसार उत्पादकांना दाम दिलं जाईल. दुध उत्पादनासाठी वाढ होण्यासाठी प्रयत्न करावा.
दुधाची मागणी वाढत चालली आहे. यासाठी पुणे मुंबई या ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे चेअरमन श्री मुश्रीफ मार्गदर्शन मिळावे बोलताना म्हणाले.

सदर सभेस दूध संघाच्या अडीअडचणी व दूध संकलन वाढीविषयी विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले.‌
माजी चेअरमन अरून डोंगळे , विश्वास पाटील (आबाजी) यांनी मनोगत व्यक्त केले.‌

संचालक चेतन नरके, अमरिश घाटगे, कर्णसिंह गायकवाढ, रणजीत पाटील, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, सयाजी शेळके, युवराज पाटील, अजित नरके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सह सर्व संचालक तसेच के. डी सी. सी संचालक सुधीर देसाई, आजरा कारखाना चेअरमन मुकुंदराव देसाई, शेतकरी संघ चेअरमन महादेव पाटील, दिपक देसाई, के व्ही. येसणे, राजू होलम तालुक्यातील विविध संस्थेचे चेअरमन संचालक मंडळ सदस्य, आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.