Home कोल्हापूर - प. महाराष्ट्र चंदगडचा दौलत आज एनसीडीसीच्या कर्ज प्रकरणात ऑनलाइन लिलावात..- का?

चंदगडचा दौलत आज एनसीडीसीच्या कर्ज प्रकरणात ऑनलाइन लिलावात..- का?

Oplus_131072

चंदगडचा दौलत आज एनसीडीसीच्या कर्ज प्रकरणात ऑनलाइन लिलावात..- का?

चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगडचा दौलत साखर कारखाना व आजऱ्याचा वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना लि. गवसे हे दोन्ही कारखाने लंगोटी घालून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेले आहेत. चंदगडचा दौलत आज एनसीडीसीच्या कर्ज प्रकरणात ऑनलाइन लिलावात निघला. ही बातमी ऐकल्यावर धक्का बसला कारण की चार ते पाच टक्के कमी व्याज मिळते म्हणून आजरा गवसे कारखान्याने सुद्धा एनसीडीसीचे प्रकरण उचललेले आहे यामध्ये थकीत गेल्यानंतर कोणत्याही वजनदार माणसाचे काहीही चालत नाही.

पर्यायी कारखान्याचा लिलावच होतो के डी सी च्या तुलनेने आपल्याला ५ ते ६ कोटी रुपये व्याज कमी भरावे लागणार आहे के डी सी मध्ये नामदार मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादाने कर्ज थकलं तरी मागे पुढे मुदत करून पर्याय निघत होता.

पण आता कर्ज थकलं तर पर्याय निघतच नाही तेव्हा दौलतची एनसीडीसी १८ कोटी कर्जाची अवस्था पाहिल्यावर आपल्या कारखाना संचालकांनी एनसीडीसीकडून कारखान्यावर घेतलेल्या १२० कोटी रुपये कर्जाच्या बाबतीत गांभीर्याने परतफेडीच्या हप्त्यांची व्यवस्था केली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त ऊस गाळप व्यवस्थापनावरील संचालक खर्च शून्य कर्मचाऱ्यांच्या वर सुद्धा योग्य पद्धतीने खर्च इत्यादी बाबी हाताळल्या पाहिजेत आम्ही उत्पादक म्हणून तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहणारच आहोत . याबाबत सुनील शिंदे आजरा यांनी मत व्यक्त केले आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.