आजरा. प्रतिनिधी. ०७.
आजरा साखर कारखाना अर्थिक अडचणीमुळे गेल्या दोन वर्ष बंद होता. आत्ता सर्वाच्या सहर्कायामुळे पुन्हा सहकारात सुरु होत आहे. यामध्ये कोणताही चुकीचा निर्णय होणार नाही. असे वक्तव्य कारखाना स्थळी सर्व पक्षीय बैठकित चेअरमन श्री. शिंत्रे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्वागत प्रास्ताविक संचालक मुंकुदराव देसाई यांनी केले. चेअरमन श्री. शिंत्रे पुढे बोलताना म्हणाले. देशातील, राज्यातील कारखानदारी अडचणीत आलेनंतर कसा पुन्हा सुरु करणेसाठी काय सामना करावा लागतो. अनुभवले आहे. या सर्व अडचणीचा सामना करत व सहकारात पुन्हा आणला परंतु कारखाना पुन्हा सहकारात आणण्यास देशाचे नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आम. प्रकाश आबिटकर, राजेश पाटील सह सर्व नेत्यासह विविध संस्थेचे सहकार्य शक्य झाले. आज दोन वर्षानी व्यासपीठावर बोलत आहे. यापुढे कारखाण्यात महिण्याच्या पहिल्या मंगळवारी कारखाना कार्यालयात आपल्या येणाऱ्या तक्रारी किंवा शंकेचे निरसन, आपल्या समस्या समजावून घेण्यासाठी वेळ देणार आहे. तेव्हा कारखाण्याच्या कामकाजात तक्रारी करू नये कारखाना सुरळीतपणे चालण्यासाठी सहकार्य करावे. सध्या २५० करार पूर्ण झाले असून अजून ३०० कराराची गरज आहे. यासाठी प्रयत्न चालू आहेत. आजरा तालुक्यातील एकही उसाची कांडी बाहेर जाऊ नये यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी, संचालकांनी, व हितचिंतकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. कारण बाहेरून ऊस आणून वाहतूक खर्च न परवडणारा आहे. देणी कमी करून कमी खर्चात कारखाना कसा चालवता येईल याचं नियोजनबद्ध कामकाज चालू आहे. तर दुसरीकडे प्रामुख्याने कामगारांनी पगार कपाताची जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे. यापुढे आपल्या सहकार्याची गरज आहे. यापुढे काय करायचं ठरवू पण मागील गोष्टी उकरून विनाकारण चर्चा करू नये व कारखान्यात राजकारण आणू नये ३० हजार सभासदांचा हा कारखाना आहे. कारखाना चा गाडा सुरळीत चालवण्यासाठी सभासदांचे ही नेहमी लक्ष असण्यासाठी व योग्य सूचना करण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सभासदांनी सूचना द्याव्यात असे शेवटी बोलताना चेअरमन श्री शिंत्रे म्हणाले. यावेळी नुतन जि.प.उपाध्यक्ष जयवंराव शिंपी गोकुळच्या संचालिका व कारखान्याच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष कारखान्याचे माजी चेअरमन अल्बड डिसोजा यांचा सत्कार कारखाना व कामगार संघटना यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय बैठकीत सूचना मांडण्यासाठी शिवसेनेचे ता. प्रमुख युवराज पवार, तसेच इंद्रजीत देसाई, हरिबा कांबळे, शिवाजी नेवगे, शंकर कुराडे, निवृत्ती कांबळे, यासह सभासदानी सूचना चर्चेत सहभाग घेतला होता. या प्रश्नांची उत्तरे चेअरमन श्री शिंत्रे यांनी दिली.
या सर्व पक्षीय बैठकीला व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी, माजी चेअरमन अशोक चराटी, संचालक राजेंद्र सावंत, मारुती घोरपडे, सुधिर देसाई, एम. के. देसाई, सुनिता रेडेकर, दशरथ अमृते, प्रकाश चव्हाण, मलिक बुरुड, आनंदा फडके, विष्णुपंत केसरकर, सह सर्व पक्षाचे पदाधिकारी कारखाना सभासद उपस्थित होते संचालक दिगंबर देसाई यांनी आभार मानले.
सभासद पांडुरंग ढवळे यांनी गेल्या दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना मंत्री महोदय व विविध संस्थांच्या वतीने मदत घेऊन चालू करण्यात आला त्याबद्दल अभिनंदन ठराव मांडला.
तर कोरोना काळापासून राज्यात तालुक्यात कोरोणामुळे व इतर आजाराने मयत झालेल्यांना श्रद्धांजली संचालक श्री घोरपडे यांनी वाहिली.
