Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगडहिंग्लज नगरपालिकेने भरुन घेतलेली घरफाळा रक्कम घरमालकांना त्वरित परत करावी. - मनसेची...

गडहिंग्लज नगरपालिकेने भरुन घेतलेली घरफाळा रक्कम घरमालकांना त्वरित परत करावी. – मनसेची मागणी.

गडहिंग्लज नगरपालिकेने भरुन घेतलेली घरफाळा रक्कम घरमालकांना त्वरित परत करावी. – मनसेची मागणी.

गडहिंग्लज प्रतिनिधी.

गडहिंग्लज येथील नगरपालिका घरफाळा आकारणी वरील व्याज माफ करणे बाबत दि.२५ रोजी
मुख्याधिकारी गडहिंग्लज यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की.
कोरोना काळात नागरिकांच्या आर्थिक परीस्थितीचा विचार करून मनसेने यापूर्वीच सरसकट घरफाळा माफ करण्याची मागणी वेळोवेळी निवेदनाद्वारे अपणाकडे केली आहे. मनसेच्या या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत पालिकेने घरफाळा माफी तर दूरच उलट घरफाळा उशिरा भरला म्हणून अतिरिक्त व्याजाची आकारणी नागरिकांच्या माथी मारली असून कोरोना मुळे होरपळलेल्या नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असे म्हणावे लागेल.
एकीकडे पालिकेच्या सदस्यांना सहलीला नेऊन शैक्षणिक प्रवासाच्या नावावर वारेमाप पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा त्याच पैशातून घरफाळा माफ करण्याऐवजी घरफाळा वसुली बरोबरच अतिरिक्त व्याजाची मागणी केल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालून अन्यायकारक व्याजाची आकारणी ताबडतोब बंद करावी व ज्यांनी आगाऊ घरफाळा भरला आहे.
त्यांची रक्कम त्यांना त्वरित परत करावी. व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडे करीत आहोत.असे न झाल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतरची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहिल आशा आशयाचे निवेदन मनसे जिल्हाअध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.